स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीला बळ; शहादा-नंदुरबारमधील दिग्गजांचा पक्षप्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीला बळ; शहादा-नंदुरबारमधील दिग्गजांचा पक्षप्रवेश

नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील

शहादा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शहादा व नंदुरबार परिसरातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर पडली आहे.

उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, आमदार सना मलिक, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शहादा माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक
माजी जि.प. सदस्य तथा गोदीपूरचे लोकनियुक्त सरपंच संजय जवरू पाडवी  
नंदुरबारचे माजी नगरसेवक निंबा मोहन माळी, भाजपचे माजी नगरसेवक नाना निकुंभे
माजी पं. स. सदस्य कृष्णा बुधा पाटील उर्फ शानाभाऊ
वंचित बहुजन युवा आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष दिनेश बिऱ्हाडे, शहराध्यक्ष विश्वजित भामरे
माजी पंचायत समिती सदस्य जगदीश अशोक निकम
खरगोनचे सरपंच अनिल लोटन रावताळे, जवखेड्याचे सरपंच मणिलाल सूर्यवंशी, भागापूरचे सरपंच पंडित विश्वनाथ मोगरे, लोहाराचे सरपंच सुरेश विजय पवार, खापरखेड्याचे सरपंच सरकार रणसिंग मालचे
माजी सरपंच विलास जगन कोतवाल, वैजालीचे युवा कार्यकर्ते कल्पेश देसले
टेंभलीचे उपसरपंच काशीराम जिर्या सोनवणे, टुकीचे उपसरपंच दिलीप नबू मुसळदे, मानमोड्याचे उपसरपंच भिल विक्रम सुकराम

जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचा मान्यवरांशी परिचय करून दिला. प्रत्येकाने आपल्या भागात केलेले सामाजिक व राजकीय काम आणि जनसंपर्क याची माहिती त्यांनी दिली. नव्या सहकाऱ्यांमुळे नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्षविस्तारासाठी फायदा होईल, असे सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, शहादा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चर्चा आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, नंदुरबार तालुका अध्यक्ष योगेश पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, तालुकाध्यक्ष संतोष पराडके, वाजीद सैय्यद, अल्ताफ पिंजारी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, सरफोद्दीन मक्रानी, छोटू कुवर, गोविंद भाऊ आणि योगी नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post