कृत्रिम खत टंचाई निर्माण झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरले जिल्हाकृषि अधिकारी यांना धारेवर*—————————

कृत्रिम खत टंचाई निर्माण झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धरले जिल्हाकृषि अधिकारी यांना धारेवर*
—————————
*

मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.

परभणी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या दालनात व्यापारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदधिकारी यांच्यात बैठक झाली, कृषी अधिकारी यांनी D.A.P. आणि युरिया खतासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना परमिट दिले जाईल असा निर्णय झाल्यावर व्यापाऱ्यांचे यावर म्हणणे असे आहे की,  काही कुृषि केंद्र संचालक  दुकानदार यांच्या कडील खताच्या मशीन मध्ये D.A.P. आणि युरिया या खतांचा साठा दाखवत आहे. 
तो आमच्या कडून ऑनलाईन करायचा राहून गेला. त्यामूळे र्ढत्या साठ्याचे परमिट देऊ नका. मशीन मध्ये जरी खत दिसत असेल तरी तो खत आम्ही विकलेला आहे. दोन दिवसांपूर्वी लागलेली युरियाच्या रॅक पासुन आपण शेतकऱ्यांना परमिट द्यावे. या व्यापाऱ्यांच्या म्हणण्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. गोदामात खत असताना कृषी केंद्र धारक सांगतात खत शिल्लक नाही हवे तर आमच्या मशीन तपासा आमच्या कडे साठा शिल्लक नाही म्हणुन शेतकऱ्यांना परत करतात. आज हि DAP खत मार्केटला आहे परंतु एका बॅगला 1800 रु ते 2000 रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात तो हाच खत असेल. मशीन मध्ये अंगठा घेतल्या शिवाय शेतकऱ्यांना खत देत नाहीत. मग मशीन मध्ये DAP आणि युरिया शिल्लक कसा दाखवत आहे. शेतकऱ्यांना खताचे परमिट हे मशीन मधील मागील DAP व युरिया खताच्या साठ्या प्रमाणे द्या. अशी स्वाभिमानीची ठाम पणाने मागणी केली. काही कर्मचारी व व्यापारी मिळुन खताचा काळा बाजार करत आहेत. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत उपलब्ध झाला नाहीतर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे
Previous Post Next Post