*अन्न व औषधी प्रशासनाचे दूर्लक्ष*
*मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रिया केलेल्या फळामूळे सामान्य नागरिकांचा जिव धोक्यात*
———————————
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.
व्यापार पेठेत मिळणार्या विविध फळावर रासायणीक प्रक्रिया केल्या मुळे सामान्य लोकांच्या जिवा बरोबर चाललेला खेळ थांबवावा *श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठान* ची उपजिल्हाधिकारी, सेलू यांच्याकडे मागणी
सविस्तर वृत्त असे की,
आज सेलू येथील सूज्ञ नागरिकांनी उपजिल्हा अधिकारी सेलू यांना दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, सेलु शहरासह तालूक्या मध्ये आंबे व इतर फळे कॅल्शियम कार्बाइड व इतर घातक रसायना मध्ये मोठ्या प्रमाणात पिकवली जात आहेत. या घातक रसायना मध्ये फळे व आंबे पिकवल्याने लोकांना तोंडात येणे, उलट्या होणे, जुलाब होणे, पोट दुखणे, तसेच कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका होत आहे.
सामान्य लोकांचे पैसे घेऊन त्यांच्या जीवाशी खेळ चालला आहे. भारतीय अन्न व औषध प्रशासनाच्या मानका प्रमाणे कॅल्शियम कार्बाईड मध्ये फळे पिकवणे बंदी आहे व गुन्हा आहे.
पण शहरातील फळ विक्रेते सर्रासपणे या केमिकलचा वापर करून लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे. तरी सर्व फळ विक्रेत्यांची तात्काळ तपासणी करून रासायणीक प्रक्रिया करून फळ विकणार्या अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी. सामान्य जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवण्यात यावा नसता *श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या* वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा ईशारा निवेदनात दिला आहे.
यावेळी जयसिंग शेळके, अनुप कान्हेकर,विनोद धापसे, गणेश शेवाळे, रवि लांडगे, संदीप पाजगे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.
***

