शिहान मंगेश भोंगाडे क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित...
सत्काराने सत्कारमूर्तीला अधिककार्य करण्याची प्रेरणा मिळते :- मोहनबाबु अग्रवाल
राजु कांबळे
मीडीया पोलीस टाईम
वर्धा अमरावती नागपूर विभागीय संपादक
वर्धा. क्षेत्र कोणतेही असो समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा कामाची दखल घेत समाजातील मानवाईक व्यक्तीकडून त्याचा यथोचित मानसन्मान सत्कार झाल्यास त्या सत्कारमूर्तीला समाजात अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी व्यक्त केले.
ते 18 जून ला निसर्ग सेवा समिती द्वारा निर्मित ऑक्सीजन पार्क वर्धा येथे विविध सामाजिक संघटना वर्धा जिल्हा तर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण व सत्कार समारंभ कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्ह्याचे माजी खासदार रामदासजी तडस, तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधरजी बेलखोडे, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, आयोजक वर्धा कलम उत्सव चे अध्यक्ष संदीप चिचाटे, उपविभागीय वन अधिकारी सुहास बढेकर, बुलढाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत सगवई, सुधाकर सुरकर, सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई कळसाईत, खादी क्षेत्रातील मुकेश लुतडे व इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कराटे खेळाच्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अधिकृत वर्धा जिल्हा संघटनेची धुरा जिल्हा सचिव व प्रतिनिधी म्हणून मागील चार वर्षापासून शिहान मंगेश भोंगाडे यांनी सांभाळली याच कार्यकाळात वर्धा जिल्ह्यातील पहिली साउथ एशियन खेळाडू घडली, शासनाच्या आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धेची सुरुवात होऊन 69 वर्ष पूर्ण झाले. या 69 वर्षात वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात एकाही खेळाडूला एकही स्वर्ण पदक मिळालं नव्हतं. परंतु यावर्षी वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंनी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच सुवर्णपदक पटकावून सर्वाधिक स्वर्ण पदक जिंकणाऱ्या यादीत भारतातून वर्धा जिल्ह्याचा पहिला क्रमांक आणून दिला. तसेच शिहान मंगेश भोंगाडे यांनी स्वतः स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडिया नावाने संघटना तयार करून महाराष्ट्रातील 26 जिल्हे व भारतातील 11 राज्याचे प्रतिनिधी तयार करून सर्वाधिक सभासद असणारे युवा शैली प्रमुख म्हणून नाव अलौकिक केलेले आहे. हे सर्व कार्य लक्षात घेता विविध सामाजिक संघटना वर्धा जिल्हा तर्फे मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते क्रीडा रत्न पुरस्कार देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात मोहन मानमोडे, दीपक पिंपरीकर, संध्याकाळी देशमुख, प्रशांत ठाकरे, जीवन बागडे, प्रमोद खोडे, सुनील सुटे, जयंत भालेराव, दिलीप मेने, राजू पलेरिया, विलास नागोसे, पूजा गोसाटकर व इत्यादी वर्धा जिल्ह्यातील गणमान्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन किरण पट्टेवर यांनी केले तर राष्ट्र वंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सतीश इखार, मोहन मोहिते, विजय सत्याम, हरीश पाटील, निखिल सातपुते, प्रवीण पेठे, भगवानदास आऊजा, प्रकाश जी खंडार, शाम पठवा, गंगाधर पाटील, हेमलताताई काळबांडे, भाजपा वर्धा शहर अध्यक्ष निलेश किटे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, वूशु स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत, बोरगाव मेघेचे सरपंच संतोष सेलूकर, समुद्रपूर तालुक्याचे क्रीडा संयोजक शिहान राजू कांबळे ( टेक्निकल डायरेक्टर SSKAI), मान्यताप्राप्त वर्धा जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष काशिनाथ रघाटाटे, खजिनदार मनीषा राऊत, सुनील चंदनखेडे, एकलव्य मार्शल आर्ट अकॅडमीचे संचालक पवन तिजारे, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे, युनिक कॅरिअर अकॅडमीचे संचालक इंद्रजीत वाघमारे, खेमराज ढोबळे व इत्यादींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिहान मंगेश भोंगाडे यांनी क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याचे श्रेय कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष भरत शर्मा, कराटे - दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष सल्लाउद्दीन अंसारी, महासचिव संदीप गाडे, कोषाध्यक्ष संदीप वाकचौरे व सर्व संघटना प्रतिनिधी यांना दिले.

