बळीराजाच्या हक्कासाठी लढा यशस्वी; शासना कडून १ हजार कोटींच्या पीकविम्याला मंजुरी

बळीराजाच्या हक्कासाठी लढा यशस्वी; शासना कडून १ हजार कोटींच्या पीकविम्याला मंजुरी

(धर्माबाद तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी नेते डॉ. भगवान भाऊ मनूरकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तब्बल १ हजार कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

२० दिवसांचे साखळी उपोषण; शेकडो गावांचा

सहभाग

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी डॉ. मनूरकर यांनी

बोळसा येथील आंदोलनापासून संघर्षाची सुरुवात केली. त्यानंतर कारेगाव फाटा येथे तब्बल २० दिवसांचे साखळी उपोषण करण्यात आले. बामणी बंधारा, मुढीत परिसरातील सिंचन प्रश्न्न, पोचमपाड बँक्कॉर्टरसाठी विशेष पॅकेज यांसह अनेक मागण्यांसाठी त्यांनी सात तालुक्यांतील शेतकऱ्यांना एकत्र आणले.

धर्माबाद बंद, तहसील कार्यालयांबर मोर्चे, तसेच पोचमपाड प्रश्नावर महामेळावे आयोजित करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला.

महापुरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय

२०२५ मधील महापुरानंतर बाधित शेतकऱ्यांना १०० टक्के पीकविमा मिळावा यासाठी डॉ.

मनूरकर यांनी जिल्हाधिकारी, महसूल अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सातत्याने पाठपुरावा केला. अनेक बैठका आणि आंदोलनांच्या माध्यमातून हा प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यात आला. या प्रयत्नांना यश येत असून, शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक कुटुंबांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम ऊस उत्पादकांनाही झाला असून, ऊस दरात प्रतिक्विंटल सुमारे ३०० ते ३५० रुपयांपर्यंत वाढ मिळवून देण्यात डॉ. मनूरकर यांना यश आल्याची माहिती शेतकरी

संघटनांकडून देण्यात आली.

शासकीय नोकरीचा त्यागः शेतकरी सेवेला प्राधान्य

मोठ्या पगाराची शासकीय नोकरी सोडून डॉ. भगवान मनूरकर यांनी स्वतःला शेतकरी सेवेसाठी समर्पित केले आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघर्ष करणे हेच माझे ध्येय आहे. अडचणीत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्याही संकोचाशिवाय माझ्यापर्यंत पोहोचता यावे, यासाठी मी २४ तास उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. मनूरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या संघर्षाची जिल्हाभर चर्चा होत आहे.
Previous Post Next Post