आदिवासी भाग नेटवर्कविना अंधारात; समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा पँथर सेनेचा इशारा* !*

* *आदिवासी भाग नेटवर्कविना अंधारात; समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा पँथर सेनेचा इशारा* !* 

 *(जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )* 


: रावेर तालुक्यातील तिड्या, अंधारमळी व मोहंमाडली या दुर्गम व आदिवासी भागातील BSNL टॉवर वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शेतकऱ्यांची कामे, बँक व्यवहार, शासकीय सेवा तसेच आपत्कालीन संपर्क व्यवस्था ठप्प होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.या गंभीर समस्येची दखल घेत ऑल इंडिया पँथर सेना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने रावेर येथील BSNL कार्यालयात शाखा व्यवस्थापकांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे संबंधित टॉवरची तात्काळ तांत्रिक तपासणी करून वारंवार होणारा बिघाड कायमस्वरूपी दूर करावा तसेच नागरिकांना अखंडित व दर्जेदार नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना मूलभूत दूरसंचार सुविधांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच समस्या तातडीने न सोडवल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, धरणे आंदोलन व जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.यावेळी आदित्य गजरे (जिल्हा महासचिव), जितू इंगळे (युवा रावेर तालुका अध्यक्ष), श्रावण भालेराव (उप तालुका अध्यक्ष, रावेर), वसीम तडवी (समाजसेवक), आमीन तडवी, हुसेन तडवी व समीर तडवी उपस्थित होते.
Previous Post Next Post