३० हजाराची लाच घेणारा जामनेर पं.स.मधील तांत्रिक सहाय्यक नावकर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
गुन्हा दाखल.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२२
विहिरीचे अनुदानासाठी ३० हजाराची लाच घेणारा जामनेर पं.स.मधील तांत्रिक सहाय्यक सागर नावकर हा लाच
लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ला.प्र.वि, लोकसेवा सागर अशोक नावकर, तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी), वय ३२ वर्ष, नेम पंचायत समिती कार्यालय, जामनेर,रा.गणपतीनगर,तळेगाव, ता.जामनेर,जि.जळगाव यांचेवर लाचमागणी कारवाई केले बाबत
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग / घटक फिर्यादी पोलीस ठाणे व गुन्हा नोंद क्रमांक कलम लाचेची मागणी रक्कम स्विकारलेली रक्कम थोडक्यात हकिगत
मार्गदर्शन जळगाव रेश्मा चंद्रकांत अवतारे, वय ३५ वर्षे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार, कॅम्प - जळगाव जामनेर पोलीस स्टेशन जि. जळगाव गु.र.नं. / २०२६ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे ३०,००० /- रूपये
निरंक मुळ तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असुन त्यावर गां.रा.ग्रा.रो.ह.यो. सन २०२१-२२ व २०२२ - २३ या वर्षात पंचायत समीती,जामनेर यांचेकडुन प्रस्तावित सिंचन विहीर मंजुर झाली होती. इलोसे सागर नावकर, तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी), पंचायत समिती, जामनेर यांनी प्रस्तावित विहीरीची
स्थळपाहणी करण्यापुर्वीच इलोसे सागर नावकर यांनी तक्रारदार यांचेकडुन गावातील रोजगार सेवक यांचे मार्फत ३०,००० /- रूपये स्विकारून इलोसे यांनी स्थळ पाहणी करून त्याचे फोटो काढुन नेले |होते.त्यानंतर तक्रारदार यांना पंचायत समीती, जामनेर यांच्याकडून वेळोवेळी ६०,९६६ /- रुपये एवढी
रक्कम मिळाली होती.व उर्वरित रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी इलोसे सागर नावकर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदारास "तुम्ही विहीरीचे ठिकाण बदल केले आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर तुम्हाला विहीरीचे पुढील अनुदान (पैसे) पाहीजे असतील, तर तुम्हाला मला ३०,०००/- रुपये द्यावे लागतील" असे सांगुन लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी
इलोसे सागर नावकर यांचेविरूध्द दि.०६/०४/२०२६ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांचेकडे तक्रार दिली
होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने ६ एप्रिल २०२६, दि.०९ एप्रिल २०२६ व
दि. १४ मे २०२६ रोजी झालेल्या लाचमागणी पडताळणी कारवाई दरम्यान इलोसे सागर नावकर,
तांत्रिक सहाय्यक ( कंत्राटी), पंचायत समिती,जामनेर,जि. जळगाव यांनी दि.०६/०४/२०२६ रोजी झालेल्या लाचमागणी पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदार यांना शासन योजनेअंतर्गत मंजुर सिंचन
विहीरीचे काम करण्यासाठी पुढील अनुदान मिळवुन देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष तक्रारदार यांना ३०,०००/-रुपयाची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे विरूध्द जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई भारत तांगडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक.माधव रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक.सुनिल दोरगे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी - योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि.,जळगांव. सापळा अधिकारी रेश्मा अवतारे,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नंदुरबार, कॅम्प - जळगांव.सापळा पथक हेमंत नागरे,पोलीस निरीक्षक, पोउप निरी. सुरेश पाटील, पोकॉ/ राकेश दुसाने,पोकॉ/ प्रदिप पोळ, पोकॉ / भुषण पाटील, सर्व नेमला. प्र. वि. जळगांव तपास अधिकारी योगेश ठाकूर,पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि.जळगांव यांनी केली.
लाचलुचपत विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की,भ्रष्टाचारासंबधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणाऱ्या
लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र नाशिक येथे सपंर्क करावा.
सपंर्क पत्ता संकेतस्थळ ला.प्र.वि. कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,जळगाव acbmaharastra.gov.in
ईमेल / ऑनलाईन तक्रार :- spacbnashik@mahapolice.gov.in,dyspacbjalgaon@gmail.com दुरध्वनी क्रमांक
:- ०२५७-२२३५४७७
संपर्क क्रमांक :-
१. ला. प्र. वि. जळगाव
२. ला.प्र.वि. नाशिक
३. ला.प्र.वि. अहिल्यानगर
४. ला.प्र.वि. धुळे
५. ला.प्र.वि. नंदुरबार
टोल क्रमांक १०६४, व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ७५८८६६१०६४
टोल क्रमांक १०६४, व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९५४५६५१०६४
टोल क्रमांक १०६४, व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९१६८६४१०६४
टोल क्रमांक १०६४, व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ७७९८१६१०६४
टोल क्रमांक १०६४, व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक ९४२३५४१०६४

