मालवाडा घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.

मालवाडा घाटात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.


(श्रीक्षेत्र माहूर नांदेड तालुका प्रतिनिधी शेख रफीक गाईड्स)

माहूर शहराच्या पूर्वेस सुमारे एक किमी अंतरावरील मालवाडा घाटात सोमवार दि.22 जून रोजी एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
      माहूर ते किनवट या राष्ट्रीय महामार्ग लगत मालवाडा गावाकडे जाणाऱ्या पाऊलवाटे जवळ    एका अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच सपोनि शरद घोडके व बिट जमादार सत्यपाल मडावी यांनी घटनास्थळ गाठून नगर पंचायतीच्या स्वर्ग रथातून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला.मयत व्यक्तीच्या अंगावर पांढरा शर्ट व फिकट निळा जीन्स पॅन्ट घातल्याचे तसेच बाजूलाच चपलजोड सोडल्याचे दिसून आले.
Previous Post Next Post