गटशिक्षणाधिकारी सुनिलकुमार तोष्णीवाल यांची विद्यासागर हायस्कूलला भेट*
*
*****————
(मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.)
मानवत तालूक्यातील करंजी येथील
विद्यासागर हायस्कूलला मानवत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सुनिलकुमार तोष्णीवाल यांनी दिली भेट यावेळी विविध शैक्षणिक उपक्रमांचा घेतला आढावा
श्री सुनीलकुमार तोष्णीवाल यांच्या सोबत गटसाधन केंद्रातील तज्ञ विषय शिक्षक यांची उपस्थिती होती. अचानक भेट देऊन शाळेतील विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी शालेय पोषणआहार योजनेची अंमलबजावणी, निपुण भारत अभियान, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, पाठ्य पुस्तकांचे वाटप तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी
भेटीदरम्यान श्री. तोष्णीवाल यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्या बाबत महत्वपूर्ण सूचना करून यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
***

