*शासकीय प्रोटोकाल नुसार सुवर्ण कन्या डॉ. पूजा चा सत्कार*
*तहसीलदार राजेश भांडारकर यांनी घरी जाऊन केले अभिनंदन*
(महेश निमसटकर
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक
भद्रावती, दि.20: जागतिक स्तरावरील एकूण ७५ देशांच्या पहिल्या योगासन क्रिडा स्पर्धेत ३५ ते ४५ वयोगटात योगासन क्रीडा क्षेत्रात डॉ.पूजा उर्फ ज्योती देवराव देऊळकर या भद्रावती च्या कन्येने सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी बजावली.
महाराष्ट्र शासनाने दखल घेत प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच डॉ. पूजा चे स्वागत करून अभिनंदन केले आहे.
त्याचे पडसाद उमटून या सुवर्ण पदक विजेत्या डॉ. पूजा वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आज दि.१९ रोजी भद्रावती चे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन सुवर्ण पदक विजेती डॉ. पूजा देऊळकर यांची भेट घेऊन अभिनंदन केले. याप्रसंगी नायब तहसीलदार मनोज आकनुरवार, सुधीर खांडरे आदी उपस्थित होते.

