यावल तालुक्यातील सार्थक बेहेडे सीए अंतिम परीक्षेत उत्तीर्ण

यावल तालुक्यातील सार्थक बेहेडे सीए अंतिम परीक्षेत उत्तीर्ण

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.२२
तालुक्यातील चिंचोली गावातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शेठ बेहेडे यांचे नातू तथा नीरज सुभाष बेहेडे यांचे सुपुत्र सार्थक नीरज बेहेडे यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट ( CA ) अंतिम परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले.
सीए होण्यासाठी अनेक शैक्षणिक टप्पे पार करावे लागतात.अत्यंत कठोर अभ्यास,शिस्त,चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावरच हे यश मिळवता येते. त्यामुळे सीए परीक्षा उत्तीर्ण होणे हे मोठे यश मानले जाते.
सार्थक यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या बळावर हे यश संपादन करून चिंचोली गावाचे तथा यावल तालुक्याचे संपूर्ण परिसराचे नाव अभिमानाने उंचावले आहे.त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम करिअरसाठी आणि पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Previous Post Next Post