भद्रावती शहरात अमली पदार्थांचा शिरकाव.. गांजा सह आरोपी अटकेत.* स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथकाची कार्यवाही

*भद्रावती शहरात अमली पदार्थांचा शिरकाव.. गांजा सह आरोपी अटकेत.* 

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथकाची कार्यवाही 

महेश निमसटकर
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 



भद्रावती , दि.19: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी जोरदार कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. आरोपीच्या राहत्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल ६२० ग्रॅम गांजा आणि मोबाईलसह १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरूनगर परिसरात सापळा रचून छापा टाकला. यावेळी गुरूदास उर्फ चेतन भास्कर पोईनकर (वय २३) याच्या घरातून गांजा विक्रीसाठी साठवलेला असल्याचे उघड झाले. आरोपी हा पान टपरीवर काम करत असताना मागील काही दिवसांपासून गुप्तपणे गांजाची विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ₹६,००० किमतीचा गांजा आणि ₹१०,००० किमतीचा मोबाईल असा एकूण ₹१६,००० चा मुद्देमाल जप्त केला. तपासात हा गांजा त्याचा साथीदार ईशांत उर्फ खवलू मानकर याच्यासोबत संगनमत करून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS Act 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला भद्रावती पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन भद्रावती करत आहे.
शहरातील स्मशान भूमी, ओपन लेआऊट, वरद विनायक मंदिर परिसर युवक गांजा सेवन करीत असल्याची कुणकुण होतीच, याचे धागेदोरे उलगडीत हि कार्यवाही करण्यात आली.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि भद्रावती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात 
सपोनि दिपक कांकेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस अंमलदार स्वामी चालेकर, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, किशोर वैरागडे, अजय बागेसर, पोलीस अंमलदार गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, महिला पोलीस अंमलदार पुजा पंधरे, चालक दिनेश उराडे  व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली.
Previous Post Next Post