हिंदुत्ववादी लोकप्रिय आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

हिंदुत्ववादी लोकप्रिय आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.१८ ( सुरेश पाटील )
रावेर-यावल मतदारसंघाचे लोकप्रिय हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावल शहरात श्री तारकेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व इतर काही ठराविक माध्यमिक, प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले. 

आमदार अमोलदादा जावळे यांच्या विचाराने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आणि वाढदिवसाचं औचित्य साधूत यावल शहरात ठीक ठिकाणी वृक्षरोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.  
आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या स्व.हरिभाऊ जावळे यांचा वारसा पुढे चालवला आहे, असे आमदार अमोलदादा जावळे आजही कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात घर करून आहेत या कार्यक्रमाच आयोजन सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं रावेर-यावल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा जावळे  यांच्या वाढदिवसानिमित्त यावल शहरातील तारकेश्वर माध्यमिक विद्यालय येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात व वृक्षारोपण करताना नगरसेविका शुभांगी रोशन येवले डॉ. युवराज चौधरी किशोर, किशोर कुलकर्णी, जितू कोळी, मुकेश कोळी, बबलू घारू, विजयशेठ कासार,विजय गजरे,सुधाकर धनगर,व्यंकटेश बारी, सुपर शॉपीचे संचालक अतुल चौधरी,रोशन येवले,पिंटू फेगडे व तारकेश्वर शाळेचे मुख्याध्यापक व स्टॉप उपस्थित होता.
Previous Post Next Post