जळगाव एमआयडीसी मधून मोटरसायकलची चोरी. पोलीस स्टेशन डायरीला नोंद तपास शून्य.

जळगाव एमआयडीसी मधून मोटरसायकलची चोरी. 

पोलीस स्टेशन डायरीला नोंद तपास शून्य.

महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल 

जळगाव दि.१६ 
जळगाव एमआयडीसी मधील श्री नवीन उद्योग एफ ८ / ९ खानदेश फ्लोर मिल जवळून गुरुवार दि. ४ जून २०२६ रोजी होंडा शाइन एम.एच.१९ सीएम ४७११ मोटरसायकल चोरीस गेली आहे. 
एमआयडीसी पोलीस स्टेशन डायरीला नोंद असली तरी तपास शून्य असल्याची माहिती मिळाली. 

चोरीस गेलेल्या दुचाकीचा मालक सतीश उपाध्ये यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली परंतु अद्याप मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झालेला नाही परंतु स्टेशन डायरीला नोंद असल्याची माहिती मिळाली.एमआयडीसी परिसरातून मोटरसायकल चोरीस गेल्याने एमआयडीसी परिसरात कामगार आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अज्ञात चोरटा कोण.? चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांचा धाक राहिलेला नाही का.? किंवा चोरट्यांवर पोलिसांचा वचक नाही का.? सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याचा तपास लागणार आहे किंवा नाही याबाबत जळगाव एमआयडीसी परिसरात चर्चा असून मोटरसायकल चोरट्याचा तपास लागणार किंवा नाही.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Previous Post Next Post