कोळन्हावी येथील तरुणास अज्ञात वाहनाने धडक मारल्याने त्याचा मृत्यू यावल पोलिसात गुन्हा दाखल.

कोळन्हावी येथील तरुणास अज्ञात वाहनाने धडक मारल्याने त्याचा मृत्यू यावल पोलिसात गुन्हा दाखल.  

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.१८ ( सुरेश पाटील ) तालुक्यातील कोळन्हावी येथील २४ वर्षीय तरुणास रात्री अज्ञात वाहनाने धडक मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.१८ रोजी रात्री साडेबारा वाजता सुमारास घडली याबाबत यावल पोलिसात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कोळन्हावी येथील पवन रवींद्र कोळी वय २४ हा दि.१८ जून रोजी रात्री साडेबारा वाजेचे सुमारास कोळन्हावी डांभुर्णी रस्त्यावरील पाटाच्याचारी जवळ लघुशंकेसाठी उभा राहिला असता त्यास अज्ञात वाहनाने मागून ठोस मारली यात त्याचे डोक्याला जबर मार लागल्याने तो जबर जखमी झाला असता त्यास तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.मयताचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी तुषार सोनवणे यांनी केले, याबाबत यावल पोलिसात कोळन्हावी येथील उमेश दिलीप परदेशी यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भादवी कलम २३४ / २६ डीएनएस १०६ (१) २८१,१२५,( ए बी ) मोटर वेहिकल ऍक्ट १३४, या सह अन्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेबाबत परिसरात तर्कवितर्क वर्तविले जात आहेत, पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार हे करीत आहेत,
Previous Post Next Post