देगलूर पोलिसांची सिंघम पद्धतीने कामगिरी,सोन्याची एकदानी चोरणाऱ्या आरोपीला बेड्या.करडखेल बीट जमादार साहेबराव सगरोळीकर आरोपींना शोधण्यात एक्सपर्ट

देगलूर पोलिसांची सिंघम पद्धतीने कामगिरी,सोन्याची एकदानी चोरणाऱ्या आरोपीला बेड्या.

करडखेल बीट जमादार साहेबराव सगरोळीकर आरोपींना शोधण्यात  एक्सपर्ट 

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : देगलूर तालुक्यातील करडखेल येथील वयोवृद्ध महिला जिजाबाई गंगाराम कंकरणे,वय 75 त्यांच्या घराच्या हॉलमध्ये झोपल्या होत्या अज्ञात, आरोपी यांनी त्यांच्या जवळ आला व त्यांच्या जवळ असलेल्या दस्तीने त्यांचे तोंड दाबून व लोखंडे दावणाने त्यांच्या मानेवर व डाव्या डोळ्याच्या खाली मारहाण करून, त्यांना जखमी  केले त्यानंतर महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याची बोरमाळ एकदानी किंमत अंदाजे 1 लाख 50 हजार रुपये माळ तोडून घेऊन,आरोपी घटनास्थळावरून फरार  झाल्याची माहिती मिळताच   पोलीस निरीक्षक, सूर्यमोहन बोलमवाड यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी आदेश दिले.त्यानुसार करडखेल बीट जमादार साहेबराव सगरोळीकर,व पोलीस कर्मचारी संतोष बोंकलवार, यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी सविस्तर घटनेची माहिती घेतली, व परिसरामध्ये आरोपीचा शोध करण्यास सुरुवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यशस्वी झाले,व आरोपी हा तपासात आरोपीचे नाव मारुती निवृत्ती सोनकांबळे,राहणार आमदापुर तालुका देगलूर येथील रहिवासी असल्याचे,निष्पष झाले व आरोपी देगलूर येथील सराफा लाईन येथे एका सोन्याच्या दुकानात,चोरीच सोन विकण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती  सूत्राद्वारे पोलिसांना कळाली या माहितीच्या,आधारे सायबर सेलचे रवींद्र सिटीकर यांच्या मदतीने सापळा, रचण्यात आला व आरोपीला देगलूर शहरातील मुद्देमाला सहित  ताब्यात घेण्यात आले, याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात,भारतीय न्याय संहिता  (BNS )2023 च्या कलम 19(1) अंतर्गत गुन्हा क्रमांक 200/2026 दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए डी पवार करत आहेत, दरम्यान पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड,यांच्या हस्ते जप्त करण्यात आलेली सोन्याची बोरनमाळ फिर्यादी जिजाबाई कंकरणे यांना परत,करण्यात आली आहे देगलूर पोलिसांच्या धडाकेबाज,कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांचा अभिनंदन येत आहे.
Previous Post Next Post