मार्शल आर्टच्या खेळाचे आश्रयदाते मोहनबाबु अग्रवाल -- निलेश राऊत
राजु कांबळे
मीडिया पोलीस टाईम
वर्धा नागपूर अमरावती विभागीय संपादक
वर्धा : मागील अनेक वर्षाच्या काळात वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी मार्शल आर्ट अंतर्गत येणाऱ्या अनेक खेळांच्या स्पर्धा, शिबीर व इत्यादी कार्यक्रमात आर्थिक, भौतिक व नैतिक आधार पुरवत मार्शल आर्टच्या खेळाचे आश्रयदाते बनले आहे. याचे आम्ही स्वतः उपभोगी आहोत असे प्रतिपादन वुशू स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत यांनी व्यक्त केले.
देवळी येथे ते 19 जून रोजी उद्योगपती मोहनबाबू अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात विचार व्यक्त करताना बोलत होते.
याप्रसंगी कराटे - डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे, खजिनदार सौ. मनीषा राऊत, कराटे प्रशिक्षक सेन्साई चेतन जाधव, वूशु खेळाचे अधिकृत पंच अभिषेक सोनवणे, वुशू या खेळा मध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार सन्मानित राष्टीय पदक प्राप्त खेळाडू कु. रुचिका ठेभरे आणि देवळी तालुकाप्रमुख समीर साहू व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
आजपर्यंत मोहनबाबू अग्रवाल यांनी अनेक होतकरू व गरीब खेळाडूंना प्रशिक्षण, स्पर्धेच्या खर्चात व क्रीडा साहित्य घेण्यासाठी आर्थिक पाठबळ व उत्कृष्ट मार्गदर्शन करून यशस्वीते करिता जिल्ह्याच्या खेळाडूचे मनोबल वाढवले आहे. क्रीडाकल्याणार्थ सर्वस्व देणारे असे दानशूर व्यक्ती आमच्या वर्धा जिल्ह्यात आहे हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. असे विचार मंगेश भोंगाडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी वुशू व कराटे खेळाच्या जिल्हा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, सभासद, सिनियर खेळाडू व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

