अल्पभूधारक शेतकऱ्यांना द्वारकाधीश दहीहंडी परिवाराकडून २५,००० हजारांची मदत.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी :देगलूर
देगलूर:लोहा कंधार विधानसभा चे आमदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आज देगलूर दौऱ्यावर आले अस्ता मष्णा चंदर सूर्यवंशी या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घराचे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत खूप नुकसान झाले होते, या कुटुंबाला "द्वारकाधीश दहीहंडी" परिवाराकडून लोकनेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते २५००० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. देगलूर नगरपरिषद देगलूर चे नगराध्यक्षा सौ. विजयमालाताई टेकाळे यांच्याशी विविध विषयावर चर्चा झाली असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर देगलूर येथे आले असता (गटनेता न. पा.) देगलूर लक्ष्मीकांतरावजी पदमवार, अनिकेत पाटील राजूरकर (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर), व्यंकटराव पाटील गोजेगावकर (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), बसवराज धाडे (नगरसेवक न. पा. देगलूर) शेख पाशाभाई (नगरसेवक न. पा. देगलूर ) या ठिकाणी भेट दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच नगरसेवक व पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.

