आमदार कुणावार यांच्या प्रयत्नाने पावसाळ्यापूर्वी वानरचुवा मंगरूळ रस्त्याचे काम पूर्ण: गावकऱ्यांनी माणले आभार
विदर्भ मराठवाडा विभागीय संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव ग्रामपंचायत अंतर्गत येत जंगलात लागून असलेल्या वानरचुवा गावाला मुख्य रसत्याशी जोडणारा वानरचुवा मंगरूळ रस्ताची अतिशय दैना अवस्था झाली होती.या रस्त्याने नागरीकांना पैद्दल सुध्दा चालने कठीण झाले होते.रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यामुळे येथे येणाऱ्या एसटी बस चालकाला मोठा त्रास सहन करावा लागत होता.यामुळे वेळोवेळी आगार व्यस्थापक व नागरी सरपंच विलास नवघरे यांच्याकडे रस्त्यासंबधी तक्रार करीत होते.याची माहिती सरपंच नवघरे यांनी आमदार समिर कुणावार यांना देताच त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी ७२ लाख रुपये निधी मंजूर करून दिली आणि ठेकेदारांला तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून या रस्त्याचे काम युध्द पातळीवर सुरू करून पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण झाले आहे.जंगला शेजारी असलेल्या वानरचुवा गावाकडे गेल्या ३ वर्षापासून सरपंच विलास नवघरे यांनी विशेष लक्ष देऊन गावाच्या विकासासाठी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्याकडून नवीन समाज भवन, जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली, अंगणवाडी इमारत,२५ लाख रुपये किमतीचे गावा अंतर्गत सिमेंट रोड, नवीन समश्याभुमी शेड, समश्याभुमीला जाणारा रस्ता, नवीन पाण्याची टाकी,असे जवळपास १ करोड रुपयांचे विकास कामे केली आहे.हेच नाही तर जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करून मोहगांव जोडणाऱ्या जंगल मर्गावर १० लक्ष रुपये किमतीचे काम केले असून आता या मार्गाने दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते.आता या गावाला मुख्य मार्गाशी जोडणारा वानरचुवा मंगरूळ रस्ताच्या कामासाठी सुध्दा आमदार कुणावार यांनी ७२ लाख रुपये निधी मंजूर करून दिली आहे. या निधीतून रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले आहे.आमदार कुणावार यांच्या आर्शीवादाने विकासला पेरीत होऊन वानरचुवा येथील नागरीकांनी आमदार समिरभाऊ कुणावार व सरपंच विलास नवघरे यांचे आभार मानले केले आहे.

