सावदा ता.रावेर येथे विधी उशिरा लागल्या मुळे भारतीय बौद्ध महासभा यांनी आकारले २००० रुपये दंड .

सावदा ता.रावेर येथे विधी उशिरा लागल्या मुळे भारतीय बौद्ध महासभा यांनी आकारले २००० रुपये दंड .

(जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)

  बौध्द समाजाच्या लग्न विधीची वेळ पञीकेत काय असतेआणि तो विधी चार ते पाच तास उशिरा लागत असतो पञिकेत खासदार, आमदार सभापती, अधिकारी ,पदाधिकारी यांचे नांव मोठया उत्साहाने आनंदाने लिहिले जाते .ते चर्चा करतात हा समाज सुधारला आहे परंतु  नाचण्यातच लग्न उशिरा लावतात.आज सावदा येथे कालकथित किशोर तुकाराम तायडे यांची कन्या दिक्षा रा.नरवेल ता. मुक्ताईनगर जिल्हा जळगाव व बापू शेजवळ राहणार दहिगाव संत तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांचा विवाह जवळ जवळ चार तास विलंबाने  सुरू असताना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुक्ताईनगरचे तालुका अध्यक्ष व पंडित सपकाळे जिल्हा हिशोब तपासणीस,संजय म्हसाने तालुका संघटक दिलीप पोहेकर वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष, तसेच बौद्धाचार्य                 पी. के महाले यांचे उपस्थितीत नितीन त्र्यंबक तायडे शैलेश श्रावण तायडे यांनी दंड वसूल करण्याबाबत प्रोत्साहन दिले व विधी संचालनकार बौद्धाचार्य दिलीप पोहेकर तालुका अध्यक्ष आर के मोरे यांनी आपला समाज विधी किती विलंबाने लागतो हे सामाजिक दृष्ट्या योग्य नाही याच्यावर त्यांनी प्रबोधन केले व वधू पक्ष वर पक्ष यांच्याकडून दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला. बौद्ध  समाजाने विचार करावा की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या उपकाराची जान ठेवून वेळेवर विधी लावण्याचे भान ठेवावे व सामाजिक परिवर्तन करावे अशी चर्चा ही जोर धरत आहे .
Previous Post Next Post