भूदान अंतर्गत दान करण्यात आलेल्या शेतजमिनी बेकायदा दुसऱ्यांच्या ताब्यात.
तत्कालीन तहसीलदारांच्या करामती.
महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल
यावल दि.१० ( सुरेश पाटील ) तालुक्यात भूदान अंतर्गत दान करण्यात आलेल्या शेत जमिनीची तत्कालीन तहसीलदार यांना कोणताही कायदेशीर नियमाने अधिकार नसताना शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत भूदान शेत जमीन नावावर करून देणे आणि विक्रीसाठी नाहरकत दाखले दिले असल्याचे पुरावे समोर आल्याने चौकशी सुरू असल्याने लवकरच संबंधितांवर गुन्हे दाखल होतील असे चित्र निर्माण झाले आहे.
जानेवारी २०२२ मध्ये मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यात कासवे,मोहराळे,कोळवद,चुंचाळे, डांभुर्णी,( सावखेडेसिम येथे एकूण ५ शेत गट नंबर आहेत ), आडगाव येथे ३ शेत गट नंबर , कासारखेडे,साकळी येथे २ शेत गट नंबर, पिळोदे खुर्द येथे येथील शेत गट नंबर सातबारा उताऱ्यांवरती जिल्हा भूदान सर्वे सेवा समितीच्या स्पष्ट नोंदी असताना दि.२९/०८/२००८ रोजी तत्कालीन तहसीलदाराने नाहरकत दाखला देऊन शेत खरेदी - विक्रीस परवानगी दिली आहे.
त्याचप्रमाणे दि.३१ मे २०२३ रोजी शेताच्या सातबारा उताऱ्यावर जिल्हा भूदान सेवा समिती असे नाव दाखल असताना संबंधित शेतकऱ्यांनी त्याचे नाव लावून मिळणे बाबत अर्ज केला असता तत्कालीन तहसीलदार महेश पवार यांनी मोठा आर्थिक व्यवहार करीत आपली बेकायदा पावर / आणि अधिकाराचा दुरुपयोग करीत जिल्हा भूदान समिती ऐवजी शेतकऱ्याचे नाव दाखल होणे बाबत आणि नोंद घेण्याचे आदेश संबंधितांना केले आहेत याची सुद्धा चौकशी होणार असल्याने तत्कालीन तहसीलदार महेश पवारसह तो शेतकरी अडचणीत येणार आहे.
तालुक्यातील जिल्हा भूदान समिती प्रकरणाची चौकशीसाठी नाशिक विभागीय आयुक्तां मार्फत जळगाव जिल्हाधिकारी यांना आदेश झाल्याने फैजपूर प्रांताधिकारी यांच्यामार्फत चौकशी सुरू असून प्रांताधिकारी तसेच यावल तहसीलदार अहवाल काय पाठवणार.? याकडे तालुक्यासह नाशिक विभाग महसूल क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

