हिप्परगा थडी येथे अग्नीवीर सैनिकाचा जंगी सत्कार
मेंढपाळ्याचा मुलगा महेश तुकडे बनला हिप्परगा थडी चा पहिला सैनिक
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील मेंढपाळ यांचा मुलगा महेश बाबू तुकडे बनला अग्निवीर सैनिक, जिद्द आणि मेहनत व आई-वडिलांच्या कष्टांचे उद्देश देश सेवेचे विचार, मनात ठेवून हिप्परगा थडीतील महेश बाबू तुकडे हा पहिला अग्निवीर भारतीय सैनिक दलात,निवड होऊन हिप्परगाथाडी गावचे नाव उज्वल केले आहे. त्यातच सगरोळी येथील मारुती गायकवाड, थोटवे अभिषेक,सोनकांबळे शुभम, अमोल कांबळे, यांची सुद्धा भारतीय सैन्य दलात अग्निवीर अंतर्गत भारतीय सैनिक दलात सैनिक म्हणून निवड करण्यात आली, आज दिनांक 5/06/2026 रोजी हिप्परगा थडी येथे महेश बाबू तुकडे यांचा आगमन झालं व गावकऱ्यांनी,सगरोळी येथील सर्व अग्नीवीर सैनिक व महेश बाबू तुकडे यांचा, जंगी सत्कार करण्यात आला सगरोळी येथील मारुती गायकवाड, थोटवे अभिषेक, सोनकांबळे शुभम, अमोल कांबळे, व महेश बाबू तुकडे यांच्या, घरांची परिस्थिती हालाखीची होती आई-वडील हे कष्ट करणारे अल्पभूधारक शेतकरी, व मेंढपाळ करणारे होते. या सर्वांच्या मेहनतीचे व अभिमान वाटावा असे, अग्नीवीर सैनिक दलात निवड झालेल्या पाचही सैनिकांचे,हिप्पारगा थडी येथे जंगी सत्कार करण्यात आला,यावेळी उपस्थित गावचे सरपंच इनामदार रहेबर, गावचे पोलीस पाटील शंकराप्पा मठपती, माजी सरपंच साहेबराव अंजनीकर, उपसरपंच व्यंकट तुकडे, शिक्षक कोटकर सर, पप्पू महाराज मठपती, प्रकाश पाटील अजगरे, पत्रकार राजेश आमेटवार, पत्रकार मारुती एडकेवार, वाचनालयाचे ग्रंथपाल राजू अंजनीकर, सुनील अंजनीकर, अविनाश अंजनीकर, व नंदुर येथील यादगोंडा, सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान,इम्रान पटेल, अशोक मठपती, माणिक तुकडे, साईनाथ तुकडे, साईनाथ भुरे,व सर्व तुकडे परिवार, व गावातील युवा तरुण,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिप्परगा थडीतील सर्व युवा तरुणांनी या अग्नीवर सैनिकांचा,आदर्श घ्यावा आणि आपणही देश सेवेसाठी चांगल्या मार्गाने,चांगले कार्य करावे असे मार्गदर्शन यावेळी कोटकर सर यांनी केले.

