यावल -भुसावळ रस्त्यावर खड्डे आणि झाडे- झुडपे असल्याने अपघाताची दाट शक्यता.
सार्वजनिक बांधकाम विभागासह आमदार अमोलदादा जावळे यांचे दुर्लक्ष.
महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल
यावल दि.१० ( सुरेश पाटील )
यावल भुसावळ रस्त्याचे दोन ठिकाणी गेल्या दोन वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीट बांधकाम करण्यात आले.सिमेंट काँक्रीटचा रस्ता एक वर्षाच्या आत सरळ रेषेत फाटल्याने तसेच रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने आणि वारा वादळात गेल्या आठवड्यात रस्त्याच्या आजूबाजूला व रस्त्यावर काही ठिकाणी झाडे झूडपे पडलेली आहेत ती जशीची तशी काही ठिकाणी रस्त्यावर पडून असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे.
यावल भुसावळ रस्ता यावल शहरापासून अंदाजे एक किलोमीटर त्यानंतर पुढे राजोरा फाटा ते अंजाळे पाटचारी पर्यंत सिमेंट काँक्रेटचा केला आहे.परंतु संबंधित ठेकेदाराने मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे रस्त्याचे काम न केल्यामुळे तसेच रस्त्याच्या बाजूच्या साईट पट्ट्यांचे काम न केल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता मधोमध आणि आजूबाजूला सरळ रेषेत फाटला,सायकलचे टायर त्या रस्त्यावरील फाटलेल्या रस्त्यात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.याच प्रमाणे ठीक ठिकाणी डांबरीकरणाच्या रस्त्यावर मोठमोठे जीव घेणे खड्डे पडले आहे हे खड्डे पावसाळ्याच्या आत बुजविले गेले पाहिजे अशी वाहनधारकांची मागणी आहे. सिमेंट काँक्रीटचा केलेला रस्ता निकृष्ट प्रतीचा केल्याने यावल सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अभियंता आणि निरीक्षण करणाऱ्या शाखा अभियंत्याने ठेकेदारावर काय कारवाई केली किव्वा नाही.? ठेकेदारावर दंडात्मक कारवाई किंवा ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याची कार्यवाही का केली नाही.? रस्त्यावरील खड्डे केव्हा बुजविणार.? तसेच वादळामुळे रस्त्याच्या बाजूला आणि रस्त्यात पडलेली झाडे झुडपे सार्वजनिक बांधकाम विभाग केव्हा बाजूला करणार ..? याकडे आमदार अमोलदादा चौधरी यांनी आपले लक्ष केंद्रित करून संबंधित विभागाकडून तात्काळ कार्यवाही करून घ्यावी अशी सर्व स्तरातून मागणी आहे.

