आरक्षण उपवर्गीकरणासाठी धर्माबाद ते मुंबई मोर्चात मातंग समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हा प्रा.रामचंद्र भरांडे.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : अनुसूचित जाती एससी आरक्षणाच्या अ, ब, क, ड, उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी 10 जून रोजी आयोजित धर्माबाद,ते मुंबई लाँग मार्च लोकस्वराज आंदोलन महाराष्ट्र व मातंग समाजाकडून काढण्यात येत असून, सरकारने लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरण करावे या मागणीसाठी, लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेने अनेक वर्षापासून मोर्चा, आंदोलने करण्यात आले,आहेत याच आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात सुप्रीम कोर्टाने, आरक्षण उपवर्गीकरण ताबडतोब प्रत्येक राज्यात करण्याचा आदेश दिल्यानंतरही,अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले मात्र महाराष्ट्रामध्ये, आरक्षण उपवर्गीकरण, सरकार जाणून बुजून टाळत असल्याचं निदर्शनात येत आहे,त्यामुळे धर्माबाद ते मुंबई लॉंग मार्च मोर्चा हे सरकारला जाब विचारण्यासाठी निघणार असून गेल्या अनेक दिवसापासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर, यांनी आझाद मैदान मुंबई येथे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे याविषयी, उपोषण चालू आहे आज नांदेड जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या लाँग मार्चच्या सहभागी नोंदवून लॉन्ग मार्चमध्ये सहभागी व्हावे, ही भविष्यातील महत्त्वाची लढाई असून, या लढाई त मोठ्या संख्येने सहभागी व्हा अशी विनंती लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे,यांनी मातंग समाजाला केली आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा,अत्यंत महत्त्वाचा असून आता तो निर्णय टप्प्यात पोहोचलेला आहे धर्माबाद ते मुंबई लाँग मार्चमध्ये, मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधने व तसेच गावोगावी, जाऊन समाज बांधवांमध्ये जनजागृती करावे अशी,आवाहन त्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना बिलोली येथे करण्यात आले आहे, यावेळी देवराव गाडेकर, सूर्यकांत गायकवाड,आनंद रुमाले, इंजीनियर विलास माळगे,नगरसेवक राजू कुडके, संचालक बाबुराव कुडके,यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीस लोकस्वराज आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष नागोराव कुडके, तालुका अध्यक्ष गंगाधर शिदलोन,विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटणीस सदानंद शिंदे, तालुका उपाध्यक्ष संजय हावरगेकर,शहराध्यक्ष सतीश कुडके, गंगाधर भंडारे,हनुमंत शिंदे,मारुती दुमटकर, बालाजी एलगेंद्रे, प्रशांत कटारे, माधव येडके, देवदास कोंडलाडे,सुनील जेठे,व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बिलोली येथे उपस्थित होते.

