*अकोला एलसीबीची धडक कारवाई: अवघ्या १२ तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड, ३ आरोपींना अटक; १००% मुद्देमाल जप्त*
(अकोला मुख्य जिला प्रतिनिधि इमरान खान )
अकोला, दिनांक २९ जून २०२६:स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अकोला यांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्याने तपास करत, अवघ्या १२ तासांच्या आत जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटारसायकलींसह चोरीला गेलेली रोकड असा एकूण २,१५,२०० रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.सायबा हॉटेल व पाररकर शोरूमसमोरील घटना२७ जून २०२६ रोजी फिर्यादीने खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती की, शिवापूर येथील सायबा हॉटेलजवळ काही युवकांनी त्यांची मोटारसायकल थांबवून, ते एकटे असल्याचे पाहून त्यांना लोखंडी वस्तूने डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादी जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्याच आरोपींनी पाररकर शोरूमसमोर चाकूचा धाक दाखवून धमकावले होते आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने १,२०० रुपये काढून पळ काढला होता. या तक्रारीवरून खदान पोलीस ठाण्यात अप.क्र. ११७२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०९(४), ११८(१), ३५१(२), ३५२, आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.१२ तासांत आरोपी गजाआडघटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन लेव्हरकर यांना तात्काळ समांतर तपासाचे आदेश दिले. एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील तीन आरोपींना ताब्यात घेतले:१. अजय सुधाकर डोईफोडे (वय २० वर्ष, रा. अकोट फाईल, अकोला)२. अमन मनोज भगत (वय १९ वर्ष, रा. गुलजारपुरा, अकोला)३. अरहत अतुल अवचार (वय १८ वर्ष, रा. भीम नगर, अकोला)पोलिसांनी सखोल चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.१००% मुद्देमाल जप्त आणि साथीदारांचा शोध सुरूआरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या ३ मोटारसायकली (किंमत अंदाजे २,१४,०००/- रुपये) आणि जबरीने चोरलेली रोकड १,२००/- रुपये, असा एकूण २,१५,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील त्यांचे काही साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त मुद्देमाल आणि आरोपींना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.तपास पथकही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण, पोलीस अंमलदार शेख हसन, रवी खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्र मलिये, किशोर सोनुने, भास्कर धोत्रे, फिरोजखान, मंगेश इंगळे, अमोल दिपके, श्रीकांत पाोंड, सतीश पवार, स्वप्नील चौधरी, चालक मनीष ठाकरे आणि सायबर विभागाचे गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली आहे.

