राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपचा उद्घाटन सोहळा संपन्न .कराटे खेळाच्या माध्यमातून निरोगी व निर्भय समाजाची निर्मिती - पालक मंत्री डॉ.पंकज भोयर

राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपचा उद्घाटन सोहळा संपन्न .

कराटे खेळाच्या माध्यमातून निरोगी व निर्भय समाजाची निर्मिती - पालक मंत्री डॉ.पंकज भोयर 

राजु कांबळे 
मीडिया पोलीस टाईम 
वर्धा नागपूर विभागीय  संपादक 


   देवळी:- महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कराटेचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे कराटे केवळ मारामारीचे साधन नसून शारीरिक व मानसिक संतुलन साधत एक उत्तम चारित्र्य आणि निरोगी समाज घडवण्याचे माध्यम आहे. 

    कराटे या मार्शल आर्ट खेळाच्या माध्यमातून केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे तर मानसिक कणखरपणा शिस्त आणि आत्मसंरक्षणाचे धडे देऊन एक निरोगी, निर्भय व सुदृढ समाजाची निर्मिती करणे शक्य आहे. कराटे खेळामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मकता, आदर आणि समाजोपयोगी गुणांचा विकास होतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृह ग्रामीण, गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खाणीकर्म तथा वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केले.

  13 जून रोजी देवळी शहरात विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इंडोर स्टेडियम देवळी येथे स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वार संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2026 चे उद्घाटक म्हणून बोलत होते. 

    याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदासजी तडस, प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्ह्याचे ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, एस एम डब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी देवळीचे संचालक दीपक सुमध, जिल्हा संघटनेचे संरक्षक इमरान राही, वर्धा कला महोत्सव चे अध्यक्ष संदीप चिचाटे, स्पोर्ट कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन मोहिते, कोषाध्यक्ष विजय सत्याम, सभासद प्रवीण पेठे, संचालक गंगाधरजी पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, स्पोर्ट शोतोकान कराटे - डो इंडियाचे महासचिव तथा स्पर्धा कंट्रोलर शिहान अनवर अली, टेक्निकल डायरेक्टर (SSKAI) शिहान राजू कांबळे, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख, मुख्य आयोजक तथा संस्था अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे, स्पर्धेचे स्वागत अध्यक्ष तथा वुशू असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत आधी अनेक मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

     स्वतःच्या बजावाची कला अवगत असल्याने समाजात वावरताना एक वेगळा आत्मविश्वास मिळतो तसेच संकटाच्या वेळी शांत राहून निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते असे मत माजी खासदार रामदासजी तडस यांनी व्यक्त केले. 

      स्पर्धेत भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटका, बिहार या राज्यातील खेळाडूंचा सहभाग असून स्पर्धेचे विभाजन दोन भागात करून पहिल्या दिवशी शनिवार 13 जूनला सब ज्युनिअर, केडिट 500 खेळाडूंची स्पर्धा व दुसऱ्या दिवशी रविवार 14 जूनला ज्युनिअर, सीनियर व मेगा इव्हेंट 600 खेळाडूंची स्पर्धा पार पाडण्याचे नियोजित करून स्पर्धेत अकराशे खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला होता. 

      कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेच्या महाराष्ट्र ब्रांच ॲडव्हायझर सेन्साई चेतन जाधव, संचालन अभिषेक सोनवणे व पूजा गोसाटकर, तर आभार मनीषा राऊत व कार्तिक भगत, प्रणय विटणकर यांनी व्यक्त केले.
Previous Post Next Post