राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी बैठकीस उपस्थित रहा**@)> प्रदेशाध्यक्ष माधवराव गायवाड.*

*राष्ट्रीय चर्मकार महासंघ उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी बैठकीस उपस्थित रहा*
*@)> प्रदेशाध्यक्ष माधवराव गायवाड.*
——————————
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.


राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मुख्य पदाधिकारी  युवक संघटनाा, महिला आघाडी,गठाई कामगार, पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष,व कार्यकर्ते यांची रविवारी दि.२१/६/२६रोजी सकाळी ११ वाजता  अंबिका मंगल कार्यालय, छत्रपती चौक,काबरानगररोड, नांदेड येथे  राज्यातील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व पदाधिकारी  चर्मकार समाजातील सर्व माता भगीनी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
  या बैठकीत अनुसूचित जाती तील अ,ब,क,ड, वर्गीकरण विरोधात दि.३०/६/२६रोजीच्या आझाद मैदान मुंबई येथील महामोर्चातील आयोजनासंबंधी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस राज्यातील वरिष्ठ प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.तरी आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व नातेवाईक व समाजबांधवांना निरोप देऊन बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे


****
Previous Post Next Post