बाबा शेख फरीद दर्गाह येथे सालाना उर्स संपन्नशेख फरीद वझरा येथे उर्स निमित्त हजारो भाविकांची उपस्थिती

बाबा शेख फरीद दर्गाह येथे सालाना उर्स संपन्न

शेख फरीद वझरा येथे उर्स निमित्त हजारो भाविकांची उपस्थिती 

(श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड माहूरगड )

माहूर तालुक्यातील शेख फरीद बाबा वझरा येथे दरवर्षीप्रमाणे बाबा शेख फरीद शकरगंज रहमतुल्ला आलैह यांचा सालाना उर्स हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दर्गाह परिसरात परंपरेप्रमाणे घोड्यावरून संदल मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती

दरवर्षीप्रमाणे इस्लामी वर्षाच्या सुरुवातीला मोहरम महिन्याच्या निमित्त तसेच बाबा शेख फरीद यांच्या प्रगट दिनानिमित्त मौजे शेख फरीद बाबा वझरा येथील दर्गाह येथे बाबा शेख फरीद यांचा उर्स मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बाबा शेख फरीद दर्गाह ही दगडात कोरलेली असून त्यावरून पाणी सुरू झाल्यास मनमोहक धबधब्याचे स्वरूप प्राप्त होत असल्याने येथे लाखोच्या संख्येने पर्यटक दरवर्षी भेट देत असतात यावर्षीही उर्स निमित्त हजारो भाविकांनी उपस्थिती लावली यावेळी मुजावर सय्यद अली यांचे कडून फातेहा खाणी तसेच रात्रीला शमा महाफलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच परंपरेप्रमाणे दर्गाह परिसरात घोड्यावरून संदल मिरवणूक काढण्यात आली 

यावेळी राज्यभरातून आलेले सर्व धर्मीय भाविक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी पोलीस बंदोबस ठेवला होता
Previous Post Next Post