परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

पिंजारी माहेमूद
 तालुका प्रतिनिधी देगलूर 

 देगलूर :दि. २१-६-२०२६ रोजी
योग दिनानिमित्त विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गिरीश वझलवार (स्थानिक समन्वय समिती उपाध्यक्ष), गिरीश गोळे (स्थानिक समन्वय समिती सहकार्यवाह), योग मार्गदर्शक प्रभाकर विभुते, कळसकर व विद्यालयाचे द्वय मुख्याध्यापक संजय कुलकर्णी व दमन देगावकर इत्यादि मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमची सुरुवात पद्याने करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयातील जेष्ठ निवृत्त शिक्षक विभुते सरांनी विद्यार्थ्यांना योगा व प्राणायाम यामध्ये अनुलोम-विलोम कपालभाती भस्रिका अशा विविध प्राणायामाची माहिती सांगितले व आपल्या रोजच्या जीवनात याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. योगासने व विविध प्राणायाम मुलांना प्रात्यक्षिक सादरीकरण घेण्यात आले. या प्रसंगी कुलकर्णी सरांनी मुलांना नियमित व्यायाम करा अशी सूचना दिली. उत्तम आरोग्य असेल तर आपल्या कडून उत्तम कार्य घडते असे ते म्हणाले. यानंतर अध्यक्ष समारोपात गोळे सरांनी मुलांना योगदानाचा केवळ शुभेछा न देता व्यायाम हा आपला नियमित सवयीचा भाग असला पाहिजे तसेच याप्रसंगी नियमित व्यायाम करणार असा संकल्प केला पाहिले असे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देगावकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बेजगमवार यांनी केले. आभार दत्तात्रय मिरलवार तर शांती मंत्र सुजित मुगुटकर यांनी सादर केले. या प्रसंगी संकुलाचे सर्व मान्यवर व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post