*धक्कादायक: बनावट CBI अधिकारी बनून २५ लाखांची लूट करणारे दोन भामटे १२ तासांत गजाआड!*
(अकोला मुख्य जिल्हा प्रतिनिधि इमरान खान अकोला,)
२० जून:स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) अधिकारी सांगून एका वृद्ध व्यापाऱ्याला तब्बल २५ लाख रुपयांना लुटणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवत व्यापाऱ्याकडून लुटलेली २५ लाखांची संपूर्ण रोकड आणि गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल असा एकूण २७.५० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.CBI चे नाव सांगून दाखवली होती भीतीमिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर बस स्थानक परिसरात आरोपींनी एका ७१ वर्षीय वृद्ध व्यापाऱ्याला गाठले. "आम्ही सीबीआय अधिकारी आहोत," अशी धमकी देऊन त्यांनी व्यापाऱ्याकडील २५ लाख रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला व पोबारा केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एलसीबीला तपासाचे आदेश दिले.५० सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक तपासएलसीबीच्या पथकाने खामगाव-बाळापूर मार्गावरील सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. हार्दिक मनोज कुमार गुरबानी (वय २२) आणि साहिल नंदकिशोर नथानी (वय २५, दोन्ही रा. खामगाव, जि. बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.१०० टक्के मुद्देमाल जप्त; पोलीस पथकाला बक्षीसपोलीस पथकाने आरोपींकडून लुटलेले संपूर्ण २५ लाख रुपये नकद आणि व्यापाऱ्याचा मोबाईल जप्त केला आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेल्या २ लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि ४० हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या उत्कृष्ट आणि जलद कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एलसीबी पथकाला २५,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.या सुजाण पथकाने बजावली कामगिरी:सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, सपोनि गोपाळ जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, रवी खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्र मलिये, भास्कर धोत्रे, किशोर सोनुने, स्वप्नील खेडकर, मंगेश इंगळे, अमोल दिपके, श्रीकांत पातोंड, राज चंदेल, राहुल गायकवाड आणि चालक देवानंद खरात यांनी बजावली आहे.

