महाराष्ट्र चा इन्फ्रा मॅन :- लाडक्या बहिणींचा देवाभाऊ
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांचा 56 व्या वाढदिवस निमित्ताने त्यांनी केलेली 56 कामांचा आढावा
(अकोला नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी)
गेले दिड दशक "देवेंद्र फडणवीस" हे नाव राज्याच्या सत्तापटलावर गाजत आहे. निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि आपल्या कामाप्रति प्रामाणिक असणारा हा लोकनेता महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा एकमेव केंद्रबिंदू ठरत आहे..
देवेंद्रजी फडणवीस हे एक लोकप्रिय नेते आहेत. सर्वात तरुण नगरसेवक, महापौर, आमदार ते मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री व सर्वात जास्त काळ पदावर असणारे तिसरे मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा राहिलेला आहे.
एक धुरंदर नेता म्हणून त्यांचे मला सर्वांत जास्त आवडणारे गुण म्हणजे हजरजबाबीपणा, जबरदस्त वक्तृत्व, एखादा विषय मांडण्याची हातोटी, राज्यभर अफाट दौरे, प्रचंड जनसंपर्क आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे स्व पक्षात असो किंवा विरोधकांच्या गोटात, पुढच्या क्षणाला काय होणार आहे ह्याचा त्यांना बहुतांश वेळा येणारा अचूक असा अंदाज. प्रत्येक क्षणी विरोधकांच्या डावाला प्रतिडाव टाकण्याची असणारी त्यांची चाणाक्ष बुद्धी..
देवेंद्रजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ती विकास कामांच्या जोरावर इन्फ्रा मॅन म्हणून तर लाडक्या बहिणींचा देवा भाऊ ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या केलेल्या कामातून झालेली आहे. आज त्यांचा 56 व्हा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी केलेली 56 कामे....
इन्फ्रा मॅन म्हणून मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक, अटल सागरी सेतू, समुद्राखालून जाणारा देशातील पहिला कोस्टल रोड, समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या महामार्गावर असलेली सगळी शहरे दळणवळणाच्या दृष्टीने जोडली गेली आहे. मुंबई,पुणे,नागपूर येथे मेट्रोचे जाळे उभारले त्याचप्रमाणे मुंबई अहमदाबाद नंतर मुंबई पुणे बुलेट ट्रेन धावण्याचा विचार करणारे देवेंद्र फडणवीस एकमेव व्यक्तिमत्व आहे.
शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना, दुसऱ्यांदा सर्वात मोठी ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना, साडेसात एच पी पर्यंत च सर्वात मोठी विज बिल माफी योजना, शेतकऱ्यांसाठी तुकडे बंदी कायदा, जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला सोलर योजना, शेत पानंद रस्ते असे अनेक कामे सांगता येतील.
महिलांसाठी लाडके बहीण योजना, लाडकी लेक योजना, लखपती दीदी, ड्रोण दीदी, उमेद च्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी मॉल उभारणे, आशासेविका अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात दुपटीने वाढ केली असून महिला सक्षमीकरण शेतकरी विधेयक पारित केले आहे.
स्वराज्याची राजधानी रायगडचे विकासासाठी 500 कोटी रुपयांचा निधी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनोस्कोकडून जागतिक संरक्षित दर्जा मिळवला आहे. त्याचबरोबर गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवले. आग्रा व दिल्ली येथे भव्य स्मारक छत्रपती शिवरायांचे उभारण्यासाठी काम सुरू केले आहे त्याचप्रमाणे हिंदू मिलचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्णत्वास जात असून बाबासाहेबांच्या पंचतीर्थांचा विकासही सुरू केला आहे. पुण्यातील भिडे वाड्याला फुले स्मारक म्हणून घोषित करून त्याचे संवर्धन व विकास करण्याचे काम केले आहे. मराठी भाषा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून मराठी भाषा विद्यापीठाचे स्थापना यानिमित्ताने केली आहे. औरंगजेबाची ओळख पुसण्यासाठी छत्रपती संभाजी नगर व धाराशिव असे शहरांचे नामकरण केले आहे.
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत दीड लाख मराठा उद्योजक निर्माण केले आहे.
मराठा समाजासाठी सारथी ओबीसींसाठी महायुती अनुसूचित जाती जमातीसाठी आरटी या संस्थांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना शिक्षणा मदत केली आहे
सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एम जे पी जे वाय या योजने अंतर्गत पाच लाखापर्यंत मदत आजारपणासाठी केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षांची निर्मिती जिल्हास्तरावर केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात डे केअर उभारले असून महाराष्ट्रातील सर्वात मोठे कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथे उभे केले आहे.
आधुनिकेतकडे वाटचाल करताना शिक्षकांसाठी पवित्र पोर्टल, शासकीय सेवांसाठी आपले सरकार पोर्टल, उद्योग परवानांसाठी मैत्री पोर्टल, महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून थेट लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा होण्याची योजना केली आहे. आशिया खंडातील सर्वात प्रगत असे सायबर सिक्युरिटी आणि कमांड सेंटर उभे केले.
धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी पंढरपूर व तुळजापूरला कॉरिडॉर मान्यता घेण्यात आली असून वारीच्या पालखी मार्गात अनेक सुविधा निर्माण केल्या असून पंढरपूर मध्ये वारकरी भवन उभारले आहे. नाशिक येथे भरणाऱ्या महाकुंभ साठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली आहे
तिसरी मुंबई निर्मितीच्या दृष्टीने पाऊल टाकले असून तीन नवीन विमानतळ उभारणी झाली असून आठ विमानतळांचा विस्तार केला आहे. मुंबईच्या बीड चाळीतील मराठी माणसाला पाचशे चौरस फूट घरी दिली आहे खेळाडूंच्या पारितोषिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असून आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वर्ग एक व दोनच्या पदावर नियुक्ती दिली आहे हुतात्मा सैनिकांच्या परिवाराला एक कोटी रुपये इतके मोठे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे देशात पहिल्यांदा ओबीसी मंत्रालयाची निर्मिती केली दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली अनाथांसाठी एक टक्के आरक्षण लागू करून त्यांना नोकरी दिल्या अनुकंपा तील सर्व अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे अकोले तालुक्यातील उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा निळवंडे धरणाचा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे
राष्ट्रीय जन सुरक्षा कायदा, लव जिहाद रोखण्यासाठी धर्म स्वातंत्र्य कायदा, गोवंश हत्या बंदी कायदा करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. असे अनेक कामे सांगू शकतो.
आजवरच्या मुख्यमंत्र्यांच्या मांदियाळीत आपले अनोखे वेगळेपण अधोरेखित करायला लावणारे देवेंद्रजी हे '#एकमेवाद्वितीय' च ठरतात.
महाराष्ट्राच्या लाडक्या लोकनेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. !
*शब्दांकन:-*.
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हा

