*मोहम्मद अली उस्ताद (इस्लामी) आखाड्यात व्यायाम मशीन चा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला*दरगाह परिसर चे चेयरमैन शेख अनवर भाई यांचे आदेशाने

*मोहम्मद अली उस्ताद (इस्लामी) आखाड्यात व्यायाम मशीन चा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला*

दरगाह परिसर चे चेयरमैन शेख अनवर भाई यांचे आदेशाने 

(हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)

हिंगणघाट येथील बाबा नन्नाशाह ईदगाह,परिसर येथे मोहम्मद अली उस्ताद (इस्लामी) आखाड्याचा भव्य उद्घाटन सोहळा  उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर तसेच नगरसेविका सौ.शीतल अमोल बोरकर, माजी नगरसेवक प्यारू भाई कुरेशी, शेख फारुख पहलवान, शेख खालिक पहलवान, शेख रशीद (चंगेश)पहलवान,ताजमोहम्मद, फकरु कुरेशी पहलवान, जावेद भाई, नदीम भाई, मेहराज भाई,यांच्या हस्ते पार पडला.

कुस्ती ही महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मोहम्मद अली उस्ताद (इस्लामी) आखाड्याच्या माध्यमातून युवकांमध्ये शिस्त, जिद्द, क्रीडाभावना आणि निरोगी जीवनशैलीची प्रेरणा निर्माण होईल, असा मला विश्वास आहे. या आखाड्यातून अनेक गुणवंत मल्ल घडून हिंगणघाटचे नाव राज्य व देशभर उज्ज्वल करतील.असे मत जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.यावेळी हिंगणघाट शहर चे प्रमुख, वार्डातील नागरिक आदी उपस्थित होते.

मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
Previous Post Next Post