जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, कळमोदे येथे लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती उत्साहात साजरी
(कळमोदा ता रावेर निसार तडवी)
दि 23 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, कळमोदे येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास केंद्र खिरोदा समन्वयक श्री. चिंचोरे सर यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक श्री विजय कोल्हेसर व सर्व शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनीही या महान व्यक्तिमत्त्वांवर भाषणे सादर करून आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

