केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव जी यांची दिल्ली येथे भेट घेऊन खालील विषयांसंदर्भात चर्चा करून निवेदन दिले
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
खालील विषय वर चर्चा करताना वर्धा जिल्हे चे खासदार मा श्री. अमर जी काळे
1) पुलगाव–आर्वी नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करून तो मार्ग वरूड पर्यंत विस्तारित करणे, या प्रकल्पाच्या अंतिम सर्वेक्षण प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देऊन कामाला सुरुवात करणेबाबत.
2)कोरोना काळात सिंदी (रेल्वे) रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या 12105/12106 विदर्भ एक्सप्रेस, 12135/12136 नागपूर-पुणे एक्सप्रेस, 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस, 18029/18030 शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरु करणेबाबत.
3)हिंगणघाट रेल्वे स्थानकावर पूर्वी थांबणाऱ्या 12976/75 जयपूर-मयसूर-जयपूर, 22648/47 कोरबा-तिरुवनंतपूरम-कोरबा, 22646/45 इंदौर-तिरुवनंतपूरम-इंदौर, 12771/72 रायपूर-सिकंदराबाद-रायपूर, 22664/63 जोधपूर-चेन्नई सेंट्रल-जोधपूर, 22738/37 हिस्सार-सिकंदराबाद-हिस्सार, 11045/46 धनबाद-कोल्हापूर-धनबाद, 20625/26 चेन्नई-भगत कि कोठी-चेन्नई रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरु करणेबाबत.
4) वर्धा व मोर्शी तालुक्यातील नागरिकांच्या मागणीनुसार सध्या नरखेडपर्यंत धावणाऱ्या खालील रेल्वेगाड्यांचा विस्तार नागपूर रेल्वे स्थानकापर्यंत करणेबाबत.
-गाडी क्र. 61103/61104 व 61105/61106 — नरखेड–बडनेरा पॅसेंजर
-गाडी क्र. 17641/17642 — नरखेड–काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस

