कारगिलच्या अमर वीरांना कृतज्ञ अभिवादन... वृक्षारोपणातून राष्ट्रभक्ती आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प..!

कारगिलच्या अमर वीरांना कृतज्ञ अभिवादन... वृक्षारोपणातून राष्ट्रभक्ती आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प..!

(हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)

दिनांक : २६ जुलै २०२६
स्थळ : रॉयल पार्क, शहालंगडी रोड, हिंगणघाट

वृक्षमित्र परिवार आयोजित वर्धापन दिन तसेच कारगिल विजय दिवस निमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रमात व  कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या अमर वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली व त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन केले.

२६ जुलै १९९९ हा दिवस भारतीय लष्कराच्या अदम्य शौर्य, पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरवशाली इतिहास सांगणारा दिवस आहे. कारगिलच्या दुर्गम शिखरांवर आपल्या वीर जवानांनी प्राणांची पर्वा न करता तिरंग्याचा मान अभिमानाने उंचावत राष्ट्ररक्षणाचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. त्यांचे बलिदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे.

वृक्षमित्र परिवार पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने राबवत असलेले वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि जनजागृतीचे कार्य अत्यंत स्तुत्य असून, लोकसहभागातून हरित भविष्य घडविण्याचा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.

यावेळी बोलताना, हिंगणघाट नगराध्यक्षा.डॉ नयना तुड़सकर मैडम, उप नगराध्यक्ष.मा ना श्री.निलेश ठोंबरे, मा ना श्री.खांडरे जी, माजी नगर सेविका.सुभागी डोंगरे, मंचावर उपस्थित होते बदलते हवामान, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलन ही आजच्या काळातील गंभीर आव्हाने असल्याचे नमूद केले. ज्या वीर जवानांनी आपल्या आजचे संरक्षण केले, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण उद्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन केले.

कारगिलच्या वीरांचे शौर्य आपल्याला राष्ट्रसेवेची प्रेरणा देते, तर प्रत्येक लावलेला आणि जगवलेला वृक्ष भावी पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि हरित भारताची हमी ठरतो. राष्ट्रभक्ती आणि पर्यावरण संरक्षणाचा हा संकल्प प्रत्येकाच्या कृतीतून साकार होवो, हीच कारगिलच्या अमर वीरांना खरी आदरांजली.
हिंगणघाट शहर चे प्रमुख व वॉर्डातील नगर सेवक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 

मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
Previous Post Next Post