व्यसनाच्या विळख्यातून युवकांना वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली टाळा, जनहिताला प्राधान्य द्या– संजयकुमार बिलोलीकर.
(मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )
नांदेड :बिलोली तालुक्यातील निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे बिलोली तालुकाध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर यांनी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना किमान एक वर्ष या पदावर कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
संजयकुमार बिलोलीकर म्हणाले, "राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि इतर आरोग्यास घातक पदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. यामुळे अनेक विद्यार्थी आणि युवक व्यसनाच्या विळख्यात जाण्यापासून वाचू शकतात. अशा जनहिताच्या कामात सातत्य राहण्यासाठी प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना पुरेसा कार्यकाळ मिळणे आवश्यक आहे."
या मागणीसाठी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, कार्याध्यक्ष सय्यद रियाज, उपाध्यक्ष वैभव घाटे,उतमराव घाटे मिलिंद मांजरमकर, राजू गादगे,मारोती एडकेवार,नागोराव लालापोड, युवराज धोतरे, लणपंत लंके, श्याम देशाई, पंचशील काळे, साईनाथ सिनगारे, ज्ञानेश्वर कोकणे, विजय वाघमारे, लक्ष्मण कांबळे, अशोक कुद्रे, नागनाथ गोकुलवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी बिलोली येथील सहायक महसूल अधिकारी एम. पी. अभंगे यांच्याकडे तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यासाठी निवेदन सादर केले.
यावेळी व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या दृष्टीने सुरू असलेल्या कठोर कारवायांना खीळ बसू नये, तसेच जनहितासाठी कार्यरत अधिकाऱ्यांची बदली तातडीने थांबवून त्यांना किमान एक वर्षाचा कार्यकाळ द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

