जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हा संचालकपदी धनंजय एकनाथराव पाटील सर यांची निवड.

जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हा संचालकपदी धनंजय एकनाथराव पाटील सर यांची निवड.

यावल दि.५ जुलै 
जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाच्या जिल्हा संचालकपदी तालुक्यातील शिरसाड येथील कै.सौ.कमलाबाई एकनाथराव पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष धनंजय एकनाथराव पाटील सर यांची राज्य व विभागीय स्तरावरून करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे शैक्षणिक, सामाजिक व ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ ही महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीला गती देणारी अग्रगण्य संघटना आहे.१३ मे १९४९  रोजी या संघाची स्थापना झालेली असून हे संघ राज्य,विभाग आणि जिल्हा पातळीवर कार्यरत आहेत.
ग्रंथालय चळवळीला अधिक बळकटी देणे,ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा प्रसार करणे तसेच सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी प्रभावी काम करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली आहे.धनंजय पाटील यांनी यापूर्वीही विविध सामाजिक,शैक्षणिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक,शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर,ग्रंथपाल,मित्रपरिवार तसेच हितचिंतकांकडून त्यांचे दूरध्वनी,संदेश व प्रत्यक्ष भेटीद्वारे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल धनंजय पाटील यांनी राज्य व विभागीय पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्व शुभेच्छुकांचे आभार व्यक्त करत जळगाव जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Previous Post Next Post