सावखेड्यात घाणीचे साम्राज्य..लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात.. ग्रामपंचायत चे दुर्लक्ष.साफसफाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
(जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी आरिप तडवी )
रावेर तालुक्यातील सावखेडा बु..गावात अनेक महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की सावखेडा ते लोहारा मार्गावरील मोटकऱ्या आदिवासी वस्तीजवळ असलेल्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे ह्या घाणीच्या साम्राज्याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांना सांगुन देखील ग्रामपंचायतचे अधिकारी व पदाधिकारी घाणीच्या साम्राज्याच्या गर्तेत असलेल्या परिसराकडे का दुर्लक्ष करीत आहेत? अशी जोरदार चर्चा देखील परिसरातील जनतेमध्ये जोर धरू लागली आहे.तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी परिस्थिती तर नाही असे गावकरी नागरिकांकडुन बोलले जात आहे.तसेच सध्या स्थितीत पावसाळा सुरू असल्याने ह्या घाणीच्या साम्राज्याचे रुपांतर विषारी डास, किडे यामध्ये व्हायला वेळ लागणार नाही,त्याआधीच ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ जागे होऊन योग्य ती उपाययोजना करुन परिसरातील जनतेचे लहान मुलांचे आरोग्य वाचवावे अशी रास्त स्वरुपाची मागणी सावखेडा येथील ग्रामस्थांनी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे

