मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावतीत रक्तदानाचा महासंकल्प; आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावतीत रक्तदानाचा महासंकल्प; 

आमदार करण देवतळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 (महेश निमसटकर 
 जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपूर)


भद्रावती दि. 22:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भद्रावती येथे आमदार करण संजय देवतळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. "रक्तदान हीच जनसेवा" या संकल्पनेत आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. वाढदिवसाचा उत्सव सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, सभापती वृषाली पांढरे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भाजयुमो अध्यक्ष विशाल ठेंगणे, अमित गुंडावार, गोपाल गोसवाडे, अनंता ताटे, पिंपळकर, निशांत देवगडे, नगरसेविका कविता सावनकर, माधुरी ढगे, लता इंदुरकर, सुषमाताई शिंदे, डॉ. बाला अनंता मांढरे, बबलू सय्यद, माजी नगरसेवक सत्तारभाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजू डोंगे, प्रवीण महाजन, स्वीय सहाय्यक प्रणव थेटे, करण मत्ते, सुनील घायवन यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार करण देवतळे यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरातून सेवा, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देण्यात आला. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा या उपक्रमातून अधोरेखित झाली.
Previous Post Next Post