"विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला काँग्रेसची साथ;
राहुल गांधींच्या अटकेचा व लाठीचार्जाचा भंडाऱ्यात तीव्र निषेध"
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
भंडारा : - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या माजी मंत्री तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मा. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज भंडारा येथे विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अखिलेश यादव यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ तसेच नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
विश्रामगृह भंडारा येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मा. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना मा. यशोमती ठाकूर म्हणाल्या, "विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाला लाठीने उत्तर देणे आणि त्यांच्या समर्थनासाठी उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शेवटपर्यंत संघर्ष करेल."
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "पेपरफुटी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र होईल. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरही लढू आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सातत्याने आवाज उठवत राहू."
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाची उच्चस्तरीय चौकशी, राहुल गांधी व अखिलेश यादव यांच्यावरील कारवाईचा निषेध, नीट (NEET) व इतर परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य माजी मंत्री यशोमती ठाकूर, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर, धनराज साठवणे, विकास राऊत, प्यारेलाल वाघमारे, जयश्री बोरकर, स्वाती वाघाये, पूजा हजारे, पूजा बाबरे, रिजवान काझी, नाहीद खान, इमरान पटेल, जयंत बोटकुळे, मंगेश हुमणे, रिजवान शेख, वैभव मेंढे, जनार्दन निंबार्ते, सोनू कोटवानी, मुलचंद ईश्वरकर, राजेश ठवकर, रविकांत कोंडासे, बाबा पाटेकर, सुरेश गोंनाडे, शीलवंत मडामे, अभिजीत वंजारी, प्रमोद मानापूरे, संजय कांबडे, नरेंद्र साकुरे, पृथ्वी तांडेकर, परमेश वलके, कमल साठवणे, किशोर राऊत, पराग सुखदेवे, सागर बावने, बालू ठवकर, रुतुजा पडोळे, माणिकराव भेंडारकर, शाहीद अली, जाहिर मालाधारी, प्रणय मेश्राम, सचिन फाले, नंदकिशोर कावडे, विजय शहारे, हसंराज आगाशे, गजानन बादशाह, भावेश वसंता नागपूरे, मनीषा निंबार्ते, शीतल राऊत, नरेश ईश्वरकर, प्रेमदास वनवे, देवेंद्र इलमे, आनंद नागोसे, शिवदास गायधने, कमलाकर रायपूरकर, राजेश हटवार, रोहित खोब्रागडे, भाऊराव दासरे, नवाब पटेल, श्रावण लांजेवार, किशोर भोयर, मनोज बन्सोड, पंकज उके, मनोज वानखेडे, धनराज सोने, महेश कोरार्म, संजय बांते, राकेश बिसने, संजय देवगडे, राजू चंगडे, संदीश शामकूर, अवंती राऊत, दुर्गेश तीमांडे, एकनाथ भुरे, अनिता भुरे, शंकर तेलमासरे, जगदीश उईके, योगेश झलके, शहिन मुन, राजू निर्वाण, योगेश गायधने तसेच भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल व सर्व फ्रंटल संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

