नाजिया इलाही खान त्यांच्या विरोधात भद्रावती पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल
महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर
भद्रावती दि. 28 जून: भद्रावती येथील मुस्लीम समाजाच्या वतीने श्रीमती नाजिया इलाही खान यांच्या विरोधात भद्रावती पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडिया व अन्य डिजिटल माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका कथित व्हिडिओ/पॉडकास्टमध्ये इस्लाम धर्म, हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) तसेच उम्मुल मोमिनीन हजरत आयशा (रज़ियल्लाहु अन्हा) यांच्याबाबत आक्षेपार्ह व भडकाऊ वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, या कथित वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात धार्मिक तेढ निर्माण होण्याची तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवेदनात संबंधित व्हिडिओ, ऑडिओ, सोशल मीडिया पोस्ट आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 196, 299, 353 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही तक्रार मुनाज शेख,हाजी जावेद अहमद, हाजीअब्बास भाई , ऐजाज अली , परवेज अहमद ,रफीक पठान, फय्याज शेख नगरसेवक,सिकंदर शेख,बाबु सय्यद, मजहर अली , राजु भाई , अजीज शेख ,मुस्ताक अली ,शाबु खान,वसिम पठान ईमरान खान,रियाज अली ,मौलाना फारूख,हाफीज कोनेन रजा,पत्रकार जावेद शेख,मोहर्तमा शाहीस्ता खान,मोहर्तमा सबीया देवगडे,भद्रावती मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर निवेदन भद्रावती पोलीस स्टेशन तर्फे पि.एस आय केदार साहेब पि. एस.आय वर्मा साहेब यांनी स्विकारले केली असून, इतर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही निवेदनासोबत जोडण्यात आल्या आहेत.

