जिल्हा परिषदेच्या आयुर्वेदिक आरोग्य मंदिरात अनियमित सेवा आणि दयनीय अवस्था.
आरोग्य सुधारणे ऐवजी बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.४ जुलै
जिल्हा परिषदेच्या आयुर्वेदिक आरोग्य मंदिरात आवश्यक तेवढा वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी वर्ग नियुक्त नसल्याने ग्रामस्थांना अनियमित,अपूर्ण वैद्यकीय सेवा मिळत आहे आणि आरोग्य मंदिराच्या आजूबाजूस स्वच्छता नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांचे आरोग्य सुधरण्या ऐवजी बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही वस्तुस्थिती आहे तालुक्यातील मारुळ येथील.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मारूळ येथील जि.प.चे आयुर्वेदिक मंदिर अनेक वर्षापासून समस्यांच्या भवऱ्यात असून घाणीच्या साम्राज्यात अडकले आहे, दवाखान्यात एक कर्मचारी असून आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी बेपत्ता झाले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि निवडणुकीच्या वेळेला मतदान मागणारे कोणीही इकडे लक्ष देत नाही,जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची कधी पाहणी केली नाही येथे कायमस्वरूपी वैद्यकीय डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने ( ८ ते १० दिवसातून एखाद्या वेळेस वैद्यकीय अधिकारी येत असल्याने ) आरोग्य केंद्रात रुग्णांनाही येणे जाणे बंद केले आहे हा दवाखाना असून नसल्यासारखाच असल्याने हा दवाखाना बंद तरी करून टाकावा अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे इकडे कोणीच फिरकत नसल्याने रुग्णालय परिसरात आजूबाजूस घाणीचे साम्राज्य पसरले आहे तिथे गवत वाढल्याने व कचरा साचल्याने दुर्गंधी सुटली आहे. साफसफाई स्वच्छता नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याकडे वरिष्ठांचे सामाजिक विरोध मतभेद द्वेष इत्यादी दृष्टिकोनातून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील रुग्णांना खाजगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत असल्याने या वैद्यकीय आरोग्य मंदिरात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची आवश्यकता संपूर्ण औषधी साहित्यसह नेमणूक करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.मारूळ गावाच्या आजूबाजूच्या पहाडाच्या पायथ्याशी अनेक खेड्या, पाड्यावरील गोरगरीब आदिवासींना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने आरोग्य मंदिर बंद पाहून त्यांना परत जावे लागत असल्याने वाजवीपेक्षा जास्त आर्थिक खर्च करावा लागत आहे.जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे मारूळ येथील प
वैद्यकीय आरोग्य मंदिर शासनाच्या नकाशावरून अदृश्य होण्याच्या मार्गावर आहे.
खेड्यापाड्यातील येणारे व मारूळ ग्रामस्थ दररोज दिवसभर दवाखाना उघडण्याची प्रतीक्षा करून अखेर त्यांना घरी परत जावे लागते.एखाद्या दिवशी दिवसातून दोन-तीन तास दवाखाना उघडा असतो या ठिकाणी एकच कर्मचारी असून येथे औषधे, पिण्याच्या पाण्याची रुग्णांसाठी कोणतीही सुविधा नाही वरिष्ठांनी एक वेळा भेट देऊन समस्या दूर करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

