महाराष्ट्र पोलिस दलात झेप घेणाऱ्या तरुणांचा भव्य सत्कार; फैजपूरमध्ये उत्साहाचे वातावरण! "नायरा पेट्रोल पंपावर यशस्वी युवकांचा गौरव; कुर्बान शेख यांच्या पुढाकाराने प्रेरणादायी सत्कार सोहळा संपन्न"

महाराष्ट्र पोलिस दलात झेप घेणाऱ्या तरुणांचा भव्य सत्कार; फैजपूरमध्ये उत्साहाचे वातावरण! 

"नायरा पेट्रोल पंपावर यशस्वी युवकांचा गौरव; कुर्बान शेख यांच्या पुढाकाराने प्रेरणादायी सत्कार सोहळा संपन्न"

(महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक रावेर / शेख शरीफ)

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील नायरा पेट्रोल पंपाचे संचालक, दोस्ताना फाउंडेशन ग्रुपचे अध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक मा. कुर्बान शेख यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र पोलिस दलात निवड झालेल्या तरुणांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा प्रेरणादायी कार्यक्रम दि. 12 जुलै 2026 रोजी नायरा पेट्रोल पंप परिसरात संपन्न झाला.
यावेळी जळगाव जिल्हा पोलिस दलात निवड झालेले साहिल शेख (निवृत्त PSI पै. शकील शेख व महाराष्ट्र चॅम्पियन यांचे सुपुत्र, सध्या जालना PTC येथे प्रशिक्षणार्थी), अजहर शेख बाबू (फैजपूर) तसेच मुंबई पोलिस दलात निवड झालेले तौसीफखान आरिफखान यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी शेख अब्दुल रसूल, शेख शब्बीर कबीर, फिरोज खान सर, अफजल खान सर, आरिफ खान, शेख फारुख भाई, अख्तर पहलवान, हाजी खलील साहेब, फिरोज भाई, शेख वासिम भाई, मुज्झेमिल रहमान, जफर अली सय्यद यांच्यासह रावेर व फैजपूर परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मा. कुर्बान शेख यांचे ज्येष्ठ बंधू आदरणीय श्री. शेख साबिर करीम साहेब यांनी प्रभावी मनोगत व्यक्त करत पोलिस सेवेत निवड झालेल्या तिन्ही युवकांचे कौतुक केले. त्यांनी प्रशिक्षण काळासाठी व पुढील पोलिस सेवेत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत समाजसेवा करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
संपूर्ण कार्यक्रम आनंदी, उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. उपस्थितांनी या यशस्वी युवकांचे अभिनंदन करत, त्यांच्या यशामुळे परिसरातील इतर तरुणांनाही पोलिस सेवेकडे वाटचाल करण्याची नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. हा सत्कार सोहळा सामाजिक ऐक्य, गुणवंतांचा सन्मान आणि युवकांना प्रोत्साहन देणारा आदर्श उपक्रम ठरला.
Previous Post Next Post