*वर्धा जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा व नियुक्ती सोहळा संपन्न.*

*वर्धा जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा व नियुक्ती सोहळा संपन्न.* 

( विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)

संघटन सृजन अभियान अंतर्गत आदिवासी काँग्रेस कमिटीच्या संघटन विस्तारासाठी आणि पक्षाचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्धा जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आणि नवीन पदनियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन आज रविवार, दिनांक १९ जुलै २०२६ रोजी, दुपारी १२:३० वाजता इंदिरा सद्दभावना भवन, मगन संग्रहालयासमोर, बॅचलर रोड, वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. सुनिलभाऊ कोल्हे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र निरीक्षक आदिवासी काँग्रेस दिल्लीचे श्री. पोलालजी खोराते, राजीव गांधी पंचायत राज महाराष्ट्राचे प्रभारी श्री. विवेकजी अवस्थी, छत्तीसगडचे निरीक्षक श्री. नरेश राठोड आणि श्री. मनोजभाऊ चांदूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच वर्धा जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरराव मडावी यांच्या विशेष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा नियुक्ती सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
​या कार्यक्रमाला सरचिटणीस श्री. सतिशजी आत्राम, श्री. जगदिशजी मसराम, श्री. राजूभाऊ वानखेडे, श्री. विजय नरांजे, श्री. श्रीकांत धोटे, श्री. शुभम, श्री. विशाल यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन श्री. नरेंद्र मसराम यांनी केले.

​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी
1) ​श्री. विजयराव मडावी (मु. तरोडा) – वर्धा जिल्हा उपाध्यक्ष
2) ​सौ. विद्याताई उईके (मु. पिंपरी) – वर्धा जिल्हा संघटक
3) ​श्री. राजुभाऊ गेडाम (मु. सावली) – जिल्हा सचिव
4) ​सौ. विद्याताई रवंडाते (मु. मसाळा) – जिल्हा उपाध्यक्ष
5) ​सौ. ज्योत्स्ना वाढवे (मु. सिंदी मेघे) – जिल्हा उपाध्यक्ष
6) ​श्री. राजुभाऊ कोहचाडे – वर्धा तालुका सहसचिव
7) ​श्री. पद्माकर सयाम (मु. निमगांव) – तालुका उपाध्यक्ष
8) ​श्री. गंगाधरराव मसराम (मु. निमगांव) – तालुका सचिव
9) ​श्री. अण्णाजी पुरके (मु. सेवाग्राम) – तालुका उपाध्यक्ष
10) ​श्री. नरेश सलामे (मु. कुरझडी) – तालुका संघटक
11) ​श्री. लक्ष्मणराव करपते (मु. बोरगाव - नांदोरा) – तालुका सहसचिव
12) ​श्री. विनोद गेडाम (मु. नागठाणा) – तालुका संघटक
13) ​श्री. भारतजी मडावी (मु. पडेगांव) – तालुका सदस्य
14) ​श्री. रामदासजी उईके (मु. तिगांव) – तालुका संघटक
15) ​श्रीमती मंदाताई मडावी (मु. रोठा) – तालुका सहसचिव
16) ​सौ. उज्ज्वलाताई कोरती (मु. रोठा) – तालुका उपाध्यक्ष
17) ​श्री. अंबादासजी मसराम (मु. खरांगणा गोडे) – तालुका उपाध्यक्ष
18) ​श्री. रामुजी करपते (मु. बोरगाव नांदोरा) – तालुका उपाध्यक्ष
19) ​श्री. शरदराव तुमराम (मु. पालोती) – तालुका उपाध्यक्ष
20) ​श्री. नागोराव चिकराम – तालुका उपाध्यक्ष
21) ​श्री. गजाननराव कोरती – तालुका संघटक
22) ​श्री. दिवाकरराव कोरचे (मु. सिंदी मेघे) – तालुका सहसचिव
23) ​श्री. लक्ष्मणराव वरे (मु. सिंदी मेघे) – तालुका सचिव
24) ​श्री. मुरलीधर तुमराम (मु. सेवाग्राम) – संघटक
25) ​श्री. केशुभाऊ आत्राम (मु. तरोडा) – सरचिटणीस
26) ​श्री. मंगेशभाऊ टेकाम (मु. निमगांव) – तालुका सहसचिव
27) ​श्री. अशोकराव मसराम (मु. नागठाणा) – उपाध्यक्ष
28) ​श्री. सुरेशराव उईके (मु. दहेगांव गोंडे) – तालुका उपाध्यक्ष
29) ​श्री. समिरभाऊ परतके (मु. सेलसुरा) – तालुका उपाध्यक्ष
30) ​श्री. दिपकराव परतेकी (मु. दहेगांव मिस्किन) – तालुका सचिव
31) ​श्री. नवनाथजी उईके (मु. आमला) – तालुका सचिव
32) ​सौ. शितलताई गेडाम (मु. सावली) – तालुका संघटक
33) ​श्री. अंकुशराव करनाके (मु. दिग्रस) – तालुका सहसचिव
34) ​श्री. जयभाऊ मडावी (मु. रोठा) – तालुका सहसचिव
35) ​सौ. सोनाली कोडापे (मु. नागठाणा) – तालुका सचिव.
Previous Post Next Post