*आषाढी एकादशीनिमित्त एकता युनियन रिक्षा स्टॉपतर्फे भाविकांना साबुदाणा फराळ वाटप*

*आषाढी एकादशीनिमित्त एकता युनियन रिक्षा स्टॉपतर्फे भाविकांना साबुदाणा फराळ वाटप* 

( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )

रावेर :आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर येथे एकता युनियन रिक्षा स्टॉपच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी साबुदाणा फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.याप्रवेळी परिसरातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ पाटील, भास्कर महाजन, गोपाल महाजन, जितु माळी.छोटू भाऊ बिरपण,  व रिक्षा स्टॉप युनियन .योगेश पवार, नानाभाऊ, योगेश महाजन, शेरा भाऊ, जितु भाऊ इंगळे आणि चंदू पाटील. ईश्वर भोई. आदींचा प्रामुख्याने समावेश होता.एकता युनियन रिक्षा स्टॉपच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत या उपक्रमाचे नेटके नियोजन केले होते. आषाढी एकादशीनिमित्त उपवास असलेल्या शेकडो भाविकांनी या फराळाचा लाभ घेतला. रिक्षा युनियनच्या या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
Previous Post Next Post