गांगापुर येथे स्मशानभूमीसाठी तातडीने जागा शेड उपलब्ध करून देण्याची सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांनी खासदार मा,अमर काळे यांच्या कडे आजनसरा येथे श्री संत भोजाजी चरणी निवेदनातून केली मागणी केली
(दारोडा प्रतिनिधी शफि पठान )
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
दि.०२ जुलै
हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथे स्मशानभूमीची जागा शेड स्टिस्ट लाईट नसल्याने येथील नागरिकांना अंतिम विधीसाठी मोठ्या त्रासाला सामोरी जावे लागत आहे तरी या ठिकाणी तातडीने स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांनी गावकऱ्यांच्या वतीने वर्धा जिल्हाचे मा खासदार अमर काळे यांची भेट श्री संत भोजाजी महाराज चरणी आजनसरा येथे भेट घेऊन निवेदनातून गांगापूर गाव मशान भूमीसाठी जागा शेड स्टिस्ट लाईट साठी केली मागणी आहे. खासदार अमर काळे साहेब यांनी असा शब्द दिला नक्कीच तुमच्या निवेदनाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावू असा अस त्यांनी म्हटलं, मात्र या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की. गांगापुर येथे स्मशानभूमीसाठी राखीव जागा नसल्याने येथील नागरिकांना लोकांना अंतिम विधीसाठी खूप मोठी अडचणी निर्माण होतात आहे,पाऊसाळा, उन्हाळा असो की हिवाळा येथिल नागरिकांना अंतिम विधी आपल्या शेतामध्ये किंवा रत्यावर मिळेल त्या जागेवर करावा लागत आहे. कधी कधी मृतदेह घरीच ठेवावा लागतो, आलेले पाहूने परत गावी जावे लागते,2015 /2016 मध्ये शासनाकडून मशान भुमी शेड बांधकाम करीता रुपये निधी मंजूर झाला होता.मात्र येथे मशान भुमीसाठी जागा शेड उपलब्ध नसल्यामुळे हा निधी शासनाकडे परत करावा लागल आहे. गेल्या कित्तेक वर्षांपूर्वी गांगापूर गाव मशानभुमी विना वंचित आहे , परंतु आता जिल्हा वार्षिक योजनेतून मशानभुमी बांधकाम करता ४ लाख मंजूर झाले आहे.परंतु जागा नसल्यामुळे हे बांधकाम थांबलेले आहे.आता पावसाळा लागला कधी होणार काम तरी शासनाकडून याची तातडीने दखल घेऊन गांगापुर येथे स्मशानभूमीसाठी जागा शेड उपलब्ध करून द्यावे अशी, जानेवारी 2026 मुंबई येथे मंत्रालयात मा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, केली होती 2024 मध्ये मा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले सर , वनविभाग फ़ॉरेस्ट डिपारर्मेंट वर्धा, नायब तहसीलदार विजय पवार हिंगणघाट,मा आमदार समीर कुणावार, यांनाही मागच्या 2025 वर्षी दिलेल्या निवेदनातून केली होती. परंतु अजून याकडे गंगापूर गावा कडे कोणीही प्रशासन जिल्हाधिकारी तहसीलदार या गांगापूर गावा मध्ये पोहचले नाही, मात्र लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का असा प्रश्न पडला पोहना सर्कल मधील गांगापुर येथिल ग्रामस्थांच्या वतीने , सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांनी वर्धा जिल्हाचे मा खासदार अमर काळे यांची आजनसरा येथे भेट घेऊन मशानभूमी साठी जागा व शेड स्टिट लाईट सचिन महाजन यांनी गावकऱ्यांनी निवेदनातून आजनसरा येथे मागणी केली आहे .

