जिल्ह्यातील नागरिकांनी वृक्षारोपणाबरोबर संवर्धनासाठी एकत्र यावे - प्रा. नरेंद्र पालांदूरकर..शहापूर येथे स्व. मनोज दाढी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा

जिल्ह्यातील नागरिकांनी वृक्षारोपणाबरोबर संवर्धनासाठी एकत्र यावे - प्रा. नरेंद्र पालांदूरकर

शहापूर येथे स्व. मनोज दाढी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा 

(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)

भंडारा:- युवक बिरादरीचे संस्थापक तथा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय श्री. मनोज दाढी सर होत. त्यांचे संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना घडविण्यात गेले आहे. आपल्या कार्यामुळे संस्कृती, समाजजागृती व युवक एकजुटीचे अमूल्य योगदान दिले. त्यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण व सांस्कृतिक समाज जागृती कार्यक्रम आमच्या डिफेन्स कॉलेजमध्ये साजरा होत आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. स्वर्गीय मनोज दाढी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण, सांस्कृतिक समाज जागृती कार्यक्रम सादर करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करणे आवश्यक आहे. कारण त्यांनी रुजवलेले समाजसेवेचे आणि संस्कृतीचे बीज आपण सर्वानी जोपासली पाहिजे. म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व  संस्कृतीच्या संवर्धनासाठी हातभार लावण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज जागृती करण्याकरिता सक्रिय सहभाग घेतल्यास स्वर्गीय श्री. मनोज दाढी यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन डिफेन्स कॉलेज शहापूरचे संस्थापक प्रा. नरेंद्र पालांदूरकर यांनी केले. 
         ते भंडारा युवक बिरादरी व डिफेन्स कॉलेज शहापूर च्या वतीने आयोजित स्व. मनोज दाढी यांच्या ६ व्या स्मृतिपित्यार्थ डिफेन्स कॉलेज शहापूर येथे वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिफेन्स कॉलेज शहापूरचे संस्थापक नरेंद्र पालांदुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर ए. आर.‌ कटरे, भंडारा युवक बिरादरीचे सदस्य विलास केजरकर, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
        उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भंडारा युवक बिरादरीचे संस्थापक स्व. मनोज दाढी यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी कॉलेजच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 
          भंडारा युवक बिरादरीच्या माध्यमातून जिल्हात अनेक गावे दत्तक घेऊन त्या ठिकाणी वृक्षारोपण लागवडीबरोबर विविध उपक्रमाच्या माध्यमातून भंडारा युवक बिरादरीच्या माध्यमातून ग्रामीण-शहरी विद्यार्थी- विद्यार्थिनींना संस्कारमय करण्याचे सदैव कार्य करत आहे. असे मत भंडारा युवक बिरादरीच्या संचालिका वर्षा मनोज दाढी यांनी व्यक्त केले. 
         स्व. मनोज दाढी यांनी जिल्ह्यातच नव्हे तर देशात युवक बिरादरीचे नाव लौकिक केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार -प्रसार करण्याचे कार्य केले. त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी लोक कलेत प्रोत्साहन दिले आहे. कॉलेजच्या परिसरात लावण्यात आलेले वड आणि पिंपळ या वृक्षांचे आयुष्य शेकडो वर्षांचे आहे. म्हणून भंडारा युवक बिरादरी वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. असे मत भंडारा युवक बिरादरीचे संचालक विलास केजरकर यांनी व्यक्त केले.
         त्यावेळी आवळा, करवंद, कडुनिंब, वडाचे झाड लावून युवक बिरादरीच्या वतीने स्व. मनोज दाढी यांना आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. नंतर युवक बिरादरीच्या युवक-युवतींनी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.
       उपस्थित मान्यवरांनी भंडारा युवक बिरादरीचे संचालक स्व. मनोज दाढी सर यांच्या जीवन कार्यावर भर दिला व भंडारा युवक बिरादरीचे उद्दिष्टे सांगितले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचे महत्व तसेच मानवाचा आणि पर्यावरणाचा संबंध यावर मार्गदर्शन केले.‌ 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारा युवक बिरादरीचे संचालक भीष्मा लांडगे व प्रास्ताविक भंडारा युवक बिरादरीच्या संचालिका वर्षा दाढी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विक्रम फडके यांनी मानले.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विक्रम फडके, सुरेंद्र कुलरकर, वैभव कोलते, शरद धोत्रे, विशाल जाखमाटे, तन्मय तितीरमारे, पियुश गवरे, आस्तिक युके, गणेश निंबार्ते, अक्षरा डीब्बे, मुस्कान सय्यद, शैलादी कोलते, भंडारा युवक बिरादरी व डिफेन्स कॉलेज शहापूर (भंडारा) येथील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
Previous Post Next Post