रावेरमध्ये MPJ चा SIR फॉर्म भरणी कॅम्प ठरला नागरिकांसाठी दिलासादायक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद'BLO'च्या सहकार्यासाठी MPJ मैदानात; SIR फॉर्म भरण्यासाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन व मदतीचा हात

रावेरमध्ये MPJ चा SIR फॉर्म भरणी कॅम्प ठरला नागरिकांसाठी दिलासादायक;  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

'BLO'च्या सहकार्यासाठी MPJ मैदानात; SIR फॉर्म भरण्यासाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन व मदतीचा हात


(महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक रावेर / शेख शरीफ)

रावेर शहरातील शौकत मैदान, इमामवाडा येथे मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (MPJ) च्या वतीने SIR फॉर्म भरणी विशेष सहाय्यता कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पला रावेर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अनेक नागरिकांचे SIR फॉर्म भरून देण्यात आले तसेच फॉर्म भरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्या विविध शंकांचेही निरसन करण्यात आले.
नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांचे SIR फॉर्म वेळेत पूर्ण व्हावेत, या उद्देशाने MPJ च्या कार्यकर्त्यांनी दिवसभर परिश्रम घेत प्रत्येक नागरिकाला आवश्यक ती मदत केली. संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.
यावेळी MPJ चे रावेर तालुकाध्यक्ष शेख फिरोज,जाकीर खान,मोईन सर,आसीफ भाई,जुल्कर सर इलयास भाई, सादीक सर,अमजद खान,यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून नागरिकांना सहकार्य करत होते.

____________________________________________
*तालुकाध्यक्ष शेख फिरोज यांची प्रतिक्रिया*

"रावेर शहरातील आमची संघटना BLO यांच्या सहकार्यासाठी खंबीरपणे उभी आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही वेळोवेळी अशा प्रकारचे सहाय्यता कॅम्प आयोजित करणार आहोत. संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांचे SIR फॉर्म भरून देण्यासाठी आम्ही सातत्याने मदत व मार्गदर्शन करत राहू," असे मत तालुकाध्यक्ष शेख फिरोज यांनी व्यक्त केले.
नागरिकांना शासकीय प्रक्रियेत सहज व वेळेत मदत मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे MPJ च्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

________________________________________
Previous Post Next Post