पातुर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी अजय पाटील विजयी...
पातूर नगर परिषदेत काँग्रेस-उबाठा आघाडीचा विजय; विकास योद्धा मंच आघाडीने भाजपाला दिला पाठिंबा
(पातूर | तालुका प्रतिनिधी दुल्हे खान)
पातूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) आघाडीचे उमेदवार अजय पाटील यांनी नगराध्यक्षांच्या निर्णायक मताच्या जोरावर विजय मिळविला. मंगळवारी नगरपरिषद सभागृहात झालेल्या विशेष सभेत अत्यंत चुरशीची लढत रंगली.
नगरपरिषदेतील पक्षीय बलाबलानुसार काँग्रेसचे ८, उबाठा गटाचे २, विकास योद्धा मंच आघाडीचे ८ आणि भाजपाचे २ नगरसेवक आहेत. काँग्रेस व उबाठा गटाने एकत्रित आघाडी स्थापन केली असून नगराध्यक्षपद काँग्रेसकडे आहे.
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस-उबाठा आघाडीकडून अजय पाटील, तर भाजपाकडून तुळसाबाई गाडगे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मतदानात काँग्रेस-उबाठा आघाडीच्या १० नगरसेवकांनी अजय पाटील यांना मतदान केले. तर विकास योद्धा मंच आघाडीच्या ८ नगरसेवकांनी भाजपाच्या २ नगरसेवकांसह तुळसाबाई गाडगे यांना पाठिंबा दिल्याने त्यांनाही १० मते मिळाली.
दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने नियमानुसार नगराध्यक्ष हिदायत खान रूम खान यांनी निर्णायक मताचा अधिकार वापरला. त्यांनी अजय पाटील यांच्या बाजूने मतदान केल्याने अजय पाटील यांना एकूण ११ मते मिळाली आणि ते पातूर नगर परिषदेचे नवे उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले.या विशेष सभेला नगराध्यक्ष हिदायत खान रूम खान यांच्यासह शितल पोहरे, मोहम्मद शाकीर, आनंदा तायडे, सुनीता वाघमारे, सय्यद सद अहमद अ्जगर खान, सुफिया सदफ शै उस्मान, महेताब अब्दुल रऊफ,ममता राजेश खोडे, हुसेनाबी सै अजीम, अश्विनी पाटील, तुळसाबाई गाडगे, डॉ. सय्यद वसीमोउद्दीन, बुशरा अंजुम मोहम्मद अलीमोद्दीन, शाहीजा परवीन मोहम्मद कैसर, कमरुन्निसा खान अदिल खान मोहम्मद फैज, मोहम्मद मकसूद,सरवत जबीन सय्यद मुजाहिद इकबाल, सय्यद मुजम्मिल, सय्यद जमाल, शाहिस्ता फिरदोस, मोहम्मद इरफान आदी नगरसेवक उपस्थित होते.
निवडीनंतर मुख्याधिकारी निलेश जाधव व कार्यालय अधीक्षक सुनील उगले यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपाध्यक्ष अजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष हिदायत खान रूम खान यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
विकास योद्धा मंच आघाडीचा भाजपाला पाठिंबा अनेकांच्या भुवया उंचावल्या
पातूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये विकास योध्दा मंच आघाडीने निवडणूक लढवली होती यावेळी त्यांनी एमआयएम वंचित बहुजन आघाडी यांच्या सोबत युती करून ही विकास योद्धा मंच आघाडी निर्माण केली होती उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विकास योद्धा मंच आघाडीने भाजपला पाठिंबा दिला ने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत भाजपाला एम आय एम वंचित बहुजन आघाडी प्रेरित विकास योध्दा मंच आघाडीने सभागृहात पाठिंबा दिल्याने अनेक चर्चेला उधाण आले आहे

