*NIIT पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकाररोधात आक्रमक आंदोलन *
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
समुद्रपूर - सतत सुरू असलेल्या पावसाची पर्वा न करता समुद्रपूर येथील महाविकास आघाडी च्या वतीने तहसील कार्यालयासमोरील NEET पेपरफुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी,कारभारा विरोधात, विद्यार्थी-युवकांवरील कथित अमानुष लाठीहल्ला तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत राष्ट्रतींना पाठविले.
श्री गुणवंताजी कोठेकर काँग्रेस चे तालुकाध्यक्ष समुद्रपूर,श्री महेश पाटील झोटिंग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे तालुकाध्यक्ष, प्रमोद जी भटे शिवासेना (उ बा ठा )तसेंच समुद्रपूर येथीलसामाजिक संघटना वघडी फाउंडेशन, शिव जयंती उत्सव समिती, बाबासाहेब उत्सव समिती, महिला मंडल, व्यापारी संघटना, बहुजन समाज पार्टी च्या वतीने
यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसातही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या कथित अनागोंदीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला. NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि व्यवस्थात्मक अपयशावर संसदेत तातडीने चर्चा करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.याशिवाय, नवी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान शांततापूर्ण निदर्शकांवर दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध नोंदविण्यात आला असून, केंद्र सरकारने लोकशाही मूल्यांचा आदर करून विद्यार्थी आणि विरोधी पक्षांवरील दडपशाही थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने संवेदनशील भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी समुद्रर शहरवासी, काँग्रेस चे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकार्यें, शिवासेनेचे कार्यकर्ते, वाघाडी फाउंडेशन समुद्रपूर चे कार्यकर्ते,गुणवंता जी कोठेकर समुद्रपूर तालुकाध्यक्ष,काँग्रेस,महेश जी झोटिंग पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस (श. प. गट ), प्रमोद जी भटे, उप जिल्हा प्रमुख (उ बा ठा ), आकाश जी जयस्वाल, डॉ रामकृष्ण जी खुजे, गजू शेन्डे,गायत्रीताई गावंडे, हेमलता रंगारी, नंदाताई तेलतुबडे, छायाताई तेलतुंबडे, शोभाताई हातेकर, गुड्डू भगत, सोनम मेंढे, संध्या माडवकर, अतुल गुजरकर, ललित डगवार, अमित मांडवकर, गजाभाऊ बोरेकर, ईश्वर सुपारे, किसना मुन, मधुजी कामळी, महिंद्रा सिरुडे, विलास वैध, निलेश शिंदे, सुभाष चौधरी, परेश बाभुळकर, प्रा. रवीजी लांबट, प्रशांत गहुकार, प्रवीण धोटे, निर्मल भोयर,संचित ढोके,अभि गिरडकर, नितीन सरोदे, आकाश वाडुळे आयुष ढवळे इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

